आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Jagannath Wani, Latest News In Divya Marathi

सामूहिक प्रयत्नातूनच होईल समाजाचा विकास : डॉ. वाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- प्रत्येक व्यक्ती समाजाचे देणे लागतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन कॅनडास्थित डॉ. जगन्नाथ वाणी यांनी केले. दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे मंगळवारी यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा जेडीसीसी सभागृहात गौरव करण्यात आला. पोलिस अधीक्षक एस.जयकुमार, धुळ्याचे माजी आमदार पी.डी.दलाल, खासदार रक्षा खडसे, माजी शिक्षक आमदार जे.यू.ठाकरे, नीळकंठ गायकवाड, भरत अमळकर, सुरेश पांडे उपस्थित होते.
वाणी म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात जा, परंतु समाजाचे ऋण फेडा. समाजसेवेसाठी जीवन सर्मपित करा. समाजात एकत्र राहताना कोणाचेही मन दुखवू नका.
एस.जयकुमार यांनी शिस्तबद्ध, प्रामाणिक मेहनत केल्यास यश नक्की मिळते, असे सांगितले.
आयपीएसपदी निवड झालेले मयूर पाटील, आयआरएसपदी निवड झालेले प्रवीण चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी गडचिरोली जिल्ह्यात भामरागड येथील डीवायएसपी पदावर असणारे दीपस्तंभचे विद्यार्थी विशाल ठाकूर यांच्या नक्षलविरोधी कामाबद्दल राष्ट्रपती शौर्यपदक मिळाल्याबद्दल त्यांच्या आई-वडिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. विकलांगतेवर मात करून स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या अपंग विद्यार्थ्यांचा, तलाठी, लिपिक, पोलिस पदांवर यशस्वी झालेल्या 30 विद्यार्थ्यांचा, अमेरिकेतील विद्यापीठात प्रथम आलेल्या निमिष भालचंद्र पाटील, एमएचसीईटी परीक्षेत प्रथम आलेल्या आशय अरुण पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. असिस्टंट कमांडर राहुल गरुड, विनोद पाटील, योगिता धांडके यांनी मनोगत व्यक्त केले. यजुर्वेंद्र महाजन यांनी प्रास्ताविक केले. जयदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
पुस्तकांचे प्रकाशन
दीपस्तंभचे जयदीप पाटील यांच्या ‘संपूर्ण विज्ञान’ या पुस्तकाची तिसरी आवृत्ती, दीपस्तंभ प्रकाशनाचे ‘करिअर आयकॉन’, ‘करिअर डायरी’, आयएएस राजेश पाटील यांच्या ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ पुस्तकाचे इंग्रजी अनुवाद आणि संदीप साळुंखे यांच्या ‘अंतरिचा दिवा’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी
विशाल ठाकूर (दोंडाईचा), डॉ. नीलेश पाटील (बीडीओ, जळगाव), उमाकांत पारधी (डीवायएसपी, चोपडा), शोभना गवळी (सहायक अभियंता, जळगाव), कुंदन बाविस्कर (सहायक अभियंता, जळगाव), विजय कुमावत (शिक्षण विस्तार अधिकारी, जळगाव), प्रा.इरफान शेख (नेट, जळगाव), प्रा. जितेंद्र अमृतकर (सेट, धुळे), प्रा.अतुल सूर्यवंशी (नेट, पाचोरा).