आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. प्रशांत चौधरी यांचा मृत्यू, जळगावात पहिल्यांदा आणले होते ब्लड गॅस मशीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पॅथाॅलाॅजीक्षेत्रात हायटेक लॅबाेरॅटरी, अशी अाेळख निर्माण केलेल्या डाॅ.प्रशांत चाैधरींचा शनिवारी शिरसाडे वणी पिंपळगाव (ता.नाशिक)जवळ अपघात झाला हाेता. उपचारादरम्यान त्यांचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती निधनाने वैद्यकीय क्षेत्राला चार महिन्यांत दुसरा माेठा धक्का बसला अाहे. गेल्या तीन वर्षांत पाच डाॅक्टरांचा अपघाती मृत्यू झाला अाहे. जळगाव जिल्ह्यात रक्तातील वायूचे प्रमाण शाेधणारे पहिले ब्लड गॅस मशीन अाणणारे डाॅ.चाैधरी अाज अापल्यात नसल्याचा शाेक व्यक्त केला जात अाहे.

पॅथाॅलाॅजिस्ट डाॅ.प्रशांत चाैधरी हे कुटुंबासह शनिवारी कारने मुंबई येथे जात हाेते. शिरसाडे वणी पिंपळगाव (ता.नाशिक)जवळ त्यांच्या कारला अपघात झाला. नागरिकांनी तातडीने जखमींना नाशिक येथील रुग्णालयात दाखल केले हाेते. व्हेंटिलेटरवर असलेल्या डाॅ.चाैधरींचे निधन झाल्याचे रविवारी सकाळी जाहीर करण्यात अाले. त्यानंतर शवविच्छेदन करून दुपारी मृतदेह जळगावकडे अाणण्यात अाला. मुंबई येथील नायर महाविद्यालयात त्यांनी एम.डी.पॅथाॅलाॅजी एससीपीएस पॅथाॅलाॅजीचे शिक्षण घेतले हाेते. त्यानंतर सन १९९४ मध्ये जळगावात पॅथाॅलाॅजीच्या माध्यमातून सेवेला सुरुवात केली. उच्च विभूषित डाॅ.चाैधरींना सुरुवातीपासूनच तंत्रज्ञानाची अावड असल्याने त्यांनी एका विशिष्ट कंपनीचे पहिले ब्लड गॅस मशीन जळगावात अाणले हाेते. त्यासाेबत हार्माेन्स इतर विशिष्ट तपासण्याही त्यांच्याकडे केल्या जात हाेत्या. मुंबई पुणे येथे हाेणाऱ्या अनेक तपासण्या जळगावात सुरू करून हायटेक लॅबच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थाने रुग्णांना चांगली सेवा उपलब्ध करून दिल्याची माहिती अायएमएचे राज्य उपाध्यक्ष डाॅ.अनिल पाटील पॅथाॅलाॅजी संघटनेचे डाॅ.भरत बाेराेले यांनी दिली.

परिवारात चार डाॅक्टर : डाॅ.प्रशांत चाैधरींचे वडील डाॅ.पी.के.चाैधरी हे भुसावळातील प्रसिद्ध जनरल प्रॅक्टिशनर अाहेत. वडिलांचाच वारसा प्रशांत यांनी एमडी पॅथाॅलाॅजीचे शिक्षण घेऊन सुरू ठेवला हाेता. त्यांची पत्नी डाॅ.वंदना प्रशांत चाैधरी ह्यादेखील स्त्रीराेगतज्ज्ञ अाहेत. डाॅ.चाैधरींच्या भगिनी डाॅ.ज्याेती गाजरे ह्यादेखील हृदयराेगतज्ज्ञ अाहेत, तर मेहुणे डाॅ.गिरीश गाजरे हे बालराेग सर्जन अाहेत.

पाच डाॅक्टरांचा अपघाती मृत्यू
तीनवर्षांपूर्वी रस्ता दुभाजकावर पडल्याने सिव्हिलमधील डाॅ.कविता साेनटक्के यांचा मृत्यू झाला हाेता. त्यानंतर मानसाेपचारतज्ज्ञ डाॅ.रवी दुसाने यांचा मुक्ताईनगरच्या सीमेवर अपघात झाला हाेता. त्यापाठाेपाठ डाॅ.राहुल काेल्हे यांचेही झाडावर वाहन अादळल्याने अपघाती निधन झाले हाेते. जानेवारी महिन्यात नूतन मराठा महाविद्यालयासमाेर डाॅ.रमाकांत पाटलांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला हाेता. अाता शिरसाडे वणी पिंपळगाव येथे अपघातात डाॅ.प्रशांत चाैधरींचे निधन झाले अाहे. गेल्या तीन वर्षांत पाच डाॅक्टरांचा अपघातात मृत्यू झाला अाहे.