आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण संवर्धनासाठी हेलिकॉप्टरमधून फेकणार बिया; डॉ.काबरांचा अनोखा उपक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- डॉक्टरी पेशा सांभाळताना पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणारे डाॅ.महेंद्र काबरा यांनी तब्बल दाेन ट्रक भरतील एवढ्या खजुराच्या बिया जमवल्या अाहेत. तीन वर्षांपासून ते या बिया वैद्यकीय व्यवसायानिमित्त देशभर प्रवास करताना कधी रेल्वे, तर कधी स्वत:च्या गाडीवर बसून रस्त्याच्या कडेला फेकत अाहेत. त्याचे चांगले परिणाम दिसून येत अाहेत. यंदा ते जंगलात चक्क हेलिकाॅप्टरमधून बिया फेकणार अाहेत. यासाठी हेलिकाॅप्टर भाड्याने घेण्याचे त्यांचे नियाेजन सुरू अाहे.

हाेमियाेपॅथीमध्ये एमडी पदवी घेतलेल्या डाॅ.काबरा शहरात अनेक वर्षांपासून देश-विदेशातील रुग्णांवर उपचार करीत अाहेत. जीवनाचा प्राधान्यक्रम ठरवताना त्यांनी ‘पर्यावरण फर्स्ट’ ही संकल्पना अंगीकारली. जिल्ह्यात झाडांना माेफत ट्री-गार्ड पुरवणारे डाॅक्टर, अशी त्यांची अाेळख अाहे. परंतु गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी एक अनाेखा उपक्रम हाती घेतला अाहे. व्यवसायानिमित्त प्रवासाला बाहेर पडताना ते स्वत:ची माेठी अॅम्बुलन्स घेऊन बाहेर पडतात. कधी रेल्वेने तर कधी स्वत:च्या चारचाकी गाड्यांमध्ये बसून बियांनी भरलेल्या पाेत्यांची माेठी थप्पी त्यांच्याकडे असते.
^घनदाट जंगलातदेखील फळे,धान्य अाणि अन्न उपलब्ध करून देणाऱ्या झाडांची गरज अाहे. अशी फळझाडे, अन्न देणाऱ्या झाडांच्या बिया जंगलात फेकण्यासाठी भविष्यात अॅम्बुलन्स कम सीड बाॅम्बिंग करण्यासाठी स्वत:चे हेलिकाॅप्टर घेण्याचा माझा मानस अाहे. -डाॅ.महेंद्र

खजूरच का?
खजूरहे उष्ण अाणि वाळवंटी प्रदेशातही सहज येते. त्याला पाणीदेखील कमी लागते. मी फेकलेल्या १०० टक्के बिया जगतीलच असे नाही. परंतु टक्काही जगल्या तरी मला समाधान अाहे. रेल्वेत प्रवासा दरम्यान दरवाजाजवळ बसून गाेणीतील बिया बाहेर फेकताना अनेकांनी भांडणे केली. परंतु काही चांगले अनुभवदेखील अाल्याचे डाॅ.काबरा सांगतात.

डाॅक्टरांच्या छंदाला पुण्याच्या व्यापाऱ्यांचे सहकार्य
डाॅक्टरांच्या अागळ्या-वेगळ्या छंदात पुण्यातील केडी सन्स कंपनीचे मालक श्याम अग्रवाल हे खजूर विक्रीचा व्यवसाय करणारे व्यापारी सहकार्य करीत अाहेत. पाणी लागलेल्या किंवा खराब झालेल्या बिया अथवा खजूर पुण्यातून ते जळगावात डाॅ.काबरा यांच्याकडे पाठवतात. गेल्या तीन वर्षांत अग्रवाल यांनी तब्बल दाेन ट्रक म्हणजे २० टन खजूर जळगावात पाठवले अाहेत. डाॅ.काबरा यांनी गाेदाम, घर अाणि गाडीमध्ये हे खजूर ठेवली अाहे. यावर्षी टन खजूर त्यांच्याकडे अाले अाहेत. डाॅक्टरांच्या अागळ्या-वेगळ्या उपक्रमात पुण्यातील व्यापारीदेखील हातभार लावत अाहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)