आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावंत यांचे पीए माळींची तक्रार करणाऱ्या डॉ. मनीषा महाजनांचा आत्महत्येचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - अाराेग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत यांच्या स्वीय सहायकाची पाेलिसात तक्रार करणाऱ्या पाताेंडा (ता.चाळीसगाव) अाराेग्य केंद्रातील अाराेग्याधिकारी डाॅ.मनीषा महाजन यांनी गुरुवारी फिनाइल प्राषण करून अात्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महाजन या गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे अाराेग्य केंद्रात अाल्या. त्यांनी लसीकरण इतर कामांची माहिती साेबतच्या कर्मचाऱ्यांकडून घेतली. दुपारी वाजता महाजन यांनी विषारी द्रव्य प्राषण केले. त्यांना देवरे हाॅस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात अाले हाेते. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी डाॅक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले, परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डाॅ.जयवंत देवरे यांनी सांगितले. पाेलिस उपअधीक्षक केशव पाताेंड, पाेलिस निरीक्षक अादिनाथ बुधवंत यांनी डाॅ.मनीषा यांची परिस्थिती जबाब नाेंदवण्यासारखी नसल्याचे सांगितले.

राज्यात पाताेंडा या एकमेव अाराेग्य केंद्राचे डिजिटलायझेशन अापल्याच काळात झाले ही बाब अनेकांना खटकत असल्याने अापले खच्चीकरण करण्याचा प्रयत्न हाेत अाहे. अापला मानसिक छळ हाेत असून अापल्या जीवितास धाेका असल्याचे निवेदन मनीषा महाजन यांनी पाेलिसात नुकतेच दिले हाेते.

काय अाहे प्रकरण ?
मनीषा महाजन या अाराेग्य मंत्री डाॅ. दीपक सावंत यांना भेटण्यासाठी मंत्रालयात गेल्या असता, त्यांना सावंत यांचे स्वीय सहायक सुनील माळी यांनी दाेन तास केबीनमध्ये बसवून ठेवले हाेते. त्याचवेळी माळी यांनी अापल्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार महाजन यांनी पाेलिसात केली हाेती. त्यानंतर माळी यांच्यावर गुन्हा दाखल झाला हाेता. त्यांनी माळी यांची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेदेखील केली हाेती.
व्हाॅट‌्सअॅप स्टेटसमध्ये माळीचे नाव
डाॅ.मनीषा महाजन यांनी बुधवारी रात्री अापले व्हाॅट‌्सअॅप स्टेटस बदलले. त्यात म्हटले की, ‘मी अाता जात अाहे. भीतीमुळे नव्हे, तर सुनील माळीकडून हाेणाऱ्या मानसिक छळ दबावामुळे. कायदाच माझा विचार करेल...’ असे इंग्रजीत लिहिले अाहे.
बातम्या आणखी आहेत...