आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्लाममधील हिंसाचाराच्या प्रश्नांवर कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईद निरुत्तर, डाॅ. अब्दुर रहेमान अंजारिया यांनी केला पाकचा दुटप्पीपणा उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - इस्लाममध्ये कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला परवानगी नाही, यासंदर्भात पाकिस्तानचा मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईद याला टि्वटरवरून प्रश्न विचारल्यानंतर तो निरुत्तर झाला होता. त्याने माझे अकाउंटही ब्लाॅक केले, असे सांगून हाफिज सईद, अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम या दाेघांना अावर घालता येत नसेल तर आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांना सरळ करतो, असे आवाहन आपण पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना वेळोवेळी केले. मात्र, माझा मोबाइल नंबर पाहून ते फोनही उचलत नाहीत, अशा शब्दात आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात समाजप्रबोधन करणारे विचारवंत डॉ.अब्दुर रहेमान अंजारिया यांनी पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघड केला.
 
‘जागतिक पातळीवरचा दहशतवाद’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी डॉ.अंजारिया जळगावात आले होते. त्या वेळी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने त्यंाच्याशी संवाद साधला असता त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादाविषयी अनेक पैलू उलगडून सांगितले. पाकिस्तान स्थित ‘माेस्ट वॉन्टेड’ दहशतवादी हाफिज सईद याला ट्विटरवर दहशतवादासंदर्भात प्रश्न विचारले होते. दहशतवाद कसा चुकीचा अाहे. इस्लाममध्ये काेणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला परवानगी नसल्याचे सांगून असे अनेक प्रश्न त्याला विचारले. तीन दिवस वाट पाहिली. मात्र, एकाही प्रश्नाला तो उत्तर देऊ शकला नाही. अखेर त्याने माझे अकाउंट ब्लाॅक केले. त्यानंतर उमर युसूफ नावाच्या एका दहशतवाद्याला माझ्या मागे लावले. त्याने अनेक दिवस माझा पाठपुरावा केला. अनेक वेगवेगळ्या घटना सांगून चिथावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला ज्यावेळी समजले की, मी त्यांच्या तावडीत सापडणार नाही. त्या वेळी त्याने यू अार लेजंट (पाकिस्तानात शहीद म्हणून वापरतात) असे म्हणून त्यानेही माझा पिच्छा साेडला, असा अनुभव डॉ.अंजारिया यांनी सांगितला. काही दिवसांनंतर ट्विटरनेच हाफिजचे दाेन अकाउंट बंद केले.हाफिजने एका अकाउंटवरून मला ब्लाॅक केले. त्यानंतर मला एक अकाउंटवरून त्याचा ‘व्हाॅट्सअॅप क्रमांक मिळाला. त्याच्यावरही एक पत्र पाठवले. त्याने मला ‘जेयूडी’ ग्रुपमध्ये जाॅइन व्हा म्हणून मॅसेज अाला, असेही डाॅ. रहेमान यांनी सांगितले. 

क्रमांक पाहून शरीफ फाेनही उचलत नाहीत 
पाकिस्तानचेसरकार नवाज शरीफ नव्हे तर हाफिज अाणि दाऊद चालवतात. पाकिस्तानी जनतेला भारताशी शत्रुत्व दाखवत राहायचे. त्यामुळे ते विकासासंदर्भात विचार करूच शकत नाहीत. पाकिस्तानी गुप्तचर संस्था अायएसअाय पाकिस्तानात शांतता राहू देणार नाही. पंतप्रधान नवाज शरीफ यांना पत्र लिहून हाफिज अाणि दाऊद हे तुमच्याकडून अावरले जाऊ शकत नाही का? त्यांना अामच्याकडे द्या, अाम्ही त्यांना सरळ करताे, असे पत्रात लिहिले अाहे. यासंदर्भात पाकिस्तान उच्चायुक्ताकडे अनेकवेळा फाेन करूनही कळवले अाहे. अाता तर ते माेबाइल क्रमांक पाहिल्यावर फाेनही उचलत नसल्याचे डाॅ. रहेमान यांनी या वेळी सांगितले. 

दहशतवाद्यांच्या पोस्टला लाइक करू नका 
आपली मुले नेमके काय करताय? याकडे लक्ष देणे महत्त्वाचे अाहे. जगभरात या दहशतवादी संघटनांचे सुमारे हजार दलाल बसलेले अाहेत. एखाद्या पाेस्टला लाइक केले की, लगेच लाइक करणारा तरुण अाहे की तरुणी हे पाहिल्यानंतर फेक अकाउंट तयार करून त्यांच्याशी चॅटिंग सुरू केले जाते. त्यात सुरुवातीला साधे मॅसेज पाठवले जातात. त्यानंतर मुस्लिमांवर अन्याय हाेत असल्याची चिथावणी देऊन जाळ्यात अाेढण्याचे काम या दहशतवादी संघटना करतात. त्यामुळे इसीस किंवा इतर दहशतवादी संघटनांच्या साेशल मीडियावरील साइटवर काेणत्याही पाेस्टला तरुणांनी लाइक करू नये, असा सल्ला डाॅ.अंजारिया यांनी या वेळी दिला. 

मुस्लिम केवळ भारतातच सुरक्षित 
भारतातीलमुस्लिम स्वत:ला असुरक्षित समजताे. मात्र मुस्लिम जगात सर्वांत सुरक्षित जर काेठे असतील तर ताे देश केवळ भारतच अाहे. मुस्लिम तरुणांच्या विकासामध्ये शिक्षणाचा अभाव हा सर्वांत माेठा अडसर अाहे. त्यामुळे इतर गाेष्टींकडे लक्ष देता शिक्षण अाणि चांगल्या पदांवर नोकरीच्या संधी शाेधल्या पाहिजेत. यासाठी पालक आणि शिक्षकांचीही तेवढीच जबाबदारी अाहे.