आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर आंबेडकर पंतप्रधान झाले असते- डॉ. डी. वाय. पाटील यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अधिक आयुष्य मिळाले असते आणि त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला नसता, तर ते देशाचे पंतप्रधान झाले असते, असे प्रतिपादन बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी पुण्यात केले. 
 
नगर येथाल आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी लिहिलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर - मैत्रेय बुद्ध’ या ग्रंथाच्या पुण्यात झालेल्या लोकर्पणप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, डॉ. विकास आबनावे, भगवान वैराट, बापू भोसले, लक्ष्मीनारायण रोहिवाल, पंडित वसंत गाडगीळ, बार्टीचे संचालक राजेश ढाबरे आदी यावेळी उपस्थित होते. 
 
यावेळी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, विद्यार्थी असताना डॉ. आंबेडकर यांना पाहण्याचे भाग्य मला लाभले. राजाराम कॉलेजमध्ये त्यांचे भाषण मी ऐकले होते. त्यांच्याइतके मानवतेचे उपासक दुसरे कुणी नव्हते. मानवतेचे ते महानायक होते. त्यांना अधिक आयुष्य लाभले असते, तर ते निश्चित या देशाचे पंतप्रधान झाले असते.
 
प्रारंभी ग्रंथाचे लेखक आचार्य सोनग्रा यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाचा अभ्यास करताना तथागताने सांगितलेली मैत्रेय बुद्धाची प्रतिमा त्यांच्या जीवनात कशी परिपूर्ण साकारली हे सांगितले. बोधिसत्वाकडून बुद्लाकडे जाणाऱ्या सर्व पारमिता (सर्वोच्च गुण) त्यांनी पालन केल्या होत्या. लाखो अनुयायांना एकाच वेळी धम्मदान देऊन त्यांनी बुद्धत्वाची उद्घोषणा केली, असे सोनग्रा म्हणाले. डॉ. पाटील यांचा आरती सोनग्रा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रंथाचे मुद्रक आनंद लाटकर यांचा सत्कार प्रेमसुख सोनग्रा यांनी केला. 
बातम्या आणखी आहेत...