आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. मोरेंनी आत्महत्या केल्याचा अंदाज, हायप्रोफाइल हत्याकांड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा रूग्णालयाच्या कुष्टरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. अरविंद मोरे यांचा ११ सप्टेंबर रोजी जळगावातील राहत्या घरात रहस्यमय मृत्यू झाला होता. दरम्यान, अत्यंत क्लिष्ट झालेल्या या प्रकरणात डॉ. मोरे यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस तपासात समोर येत आहे. 

डॉ. मोरे यांनी घरातच असलेल्या हेक्साब्लेडपासून तयार केलेल्या चाकूने स्वत:च्या हाताने गळा चिरून घेतला असावा. त्यांनी मानेच्या डाव्या बाजूने चाकू चालवण्यास सुरूवात केली. त्यामुळे डाव्या बाजुला खोलवर जखम आहे, तर उजव्या बाजुला वरवर जखम आहे. खुर्चीत बसून त्यांनी गळा चिरल्यामुळे संपुर्ण रक्त त्यांच्या शरीरावरून वाहत जमिनीवर आले आहे. काही मिनिटांनी वेदना असह्य झाल्यामुळे त्यांनी किचनमध्ये जाऊन फ्रिज उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पुन्हा माघारी फिरले. गळ्याची नस कापली गेल्यामुळे सुमारे आठ मिनिटांनंतर त्यांच्या मेंदूचा रक्तपुरवठा बंद पडल्यामुळे ते खाली कोसळले त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिस तपासात वर्तवण्यात आला आहे. तसेच डॉ. मोरे यांच्या घरात आढळून आलेले पायाचे ठसे देखील त्यांचे स्वत:चेच आहेत, असा निष्कर्ष जळगाव फॉरेन्सिक पथकाने काढला आहे. डॉ. मोरे यांच्या रहस्यमय मृत्युनंतर पोलिसांनी सर्व बाजुंनी तपास सुरू केला आहे. त्यांच्या मोबाइलमध्ये आढळून आलेल्या तसेच त्यांनी मृत्यु-पुर्वी संपर्क केलेल्या जवळपास १५ जणांची चौकशी केली. यात अधिक करून महिलांचा समावेश आहे. 
बातम्या आणखी आहेत...