आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तक वाचनातून डॉ. कलामांना अभिवादन, शिक्षकांनी मांडला जीवनपट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; भारताचेदिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. या वेळी शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
सभोवतालच्याघटना, घडामोडींचा अन्वयार्थ लावण्यासाठी तसेच रोजच्या जगण्याचा आनंद घेण्यासाठी वाचनाकडे वळा. पुस्तके वाचण्यात जी नशा आहे तेवढी नशा अन्य कोणत्याही गोष्टीत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले.
विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना आणि जनसंवाद पत्रकारिता विभागातर्फे गुरुवारी वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव प्रा. ए.एम.महाजन होते.

विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा. सत्यजित साळवे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी प्रा. आशुतोष पाटील, विद्यार्थी प्रियंका ठाकूर, वसंत कुलकर्णी, दीपक सैंदाणे, राजेंद्र दौड, दिगंबर सावकारे, भय्यासाहेब देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. टी.आर.बोरसे, प्रा. सत्यजित साळवे उपस्थित होते. प्रा. संदीप केदार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. तुकाराम दौड यांनी आभार मानले.
ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन.

विद्यापीठाच्यामध्यवर्ती ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आले. यात वाचनीय पुस्तके ठेवण्यात आली होती. ग्रंथपाल डॉ. टी.आर.बोरसे, डॉ. अनिल चिकाटे, विजय आहेर, नीलिमा म्हस्के यांनी नियोजन केले

बी.एम.जैनप्राथमिक विद्यालय
मुख्याध्यापकभास्कर फुलपगार अध्यक्षस्थानी होते. अविनाश पाटील यांनी कलाम यांचा जीवन परिचय सांगितला. भूपेंद्र अहिरे यांनी महत्त्व स्पष्ट केले. कल्पना चौधरी यांनी प्रकट वाचन कसे करावे, याबाबत सांगितले. भारती सोनवणे यांनी आभार मानले.

इकरापब्लिक स्कूल : मुख्याध्यापककाझी जमीरुद्दीन अध्यक्षस्थानी होते. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. मुलांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. मोबाइल, व्हॉट्सअॅपपासून अलिप्त राहून वाचनाची प्रेरणा मुलांना देण्यात आली. शकील शेख यांनी प्रबोधन केले. वाजीद पठाण यांनी माहिती दिली. शफीक अहेमद यांनी सूत्रसंचालन तर वसीम खान यांनी आभार मानले.

चांदसरकरिवद्यामंदिर : शाळेतकलामांच्या जीवन चरित्राविषयी माहिती दिली. मुख्याध्यापक श्याम ठाकरे अध्यक्षस्थानी होते. शिक्षक स्वप्नील भोकरे, विवेक कोठावदे, जयश्री पाटील, शारदा चौधरी, पूनम पाटील, नीलिमा माथूर, भूषण अमृतकर उपस्थित होते.

बहिणाबाईिवद्यालय : प्रतिभाखडके यांच्या हस्ते अब्दुल कलामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात अाले. वाचन प्रेरणा अभियान राबवण्यात आले. मुख्याध्यापक टी. एस. चौधरी, डॉ. विलास नारखेडे, राजेश वाणी, सीमा चाैधरी, संतोष पाटील, दिनेश चाैधरी, स्वाती काेल्हे, डाॅ. प्रतिभा राणे, विशाल पाटील यांनी डॉ. कलामांच्या जीवनकार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. यात तनुजा मिस्तरी, संजना सोनार, भक्ती जाधव, करिश्मा धायडे, अर्चना पाटील, राज पाटील, मंदार पाटील, रुपाली महाजन, राकेश बारी, तेजस बारी यांनी सहभाग नोंदवला.
रत्नाजैन विद्यालय :विद्यार्थ्यांना वाचनाची गाेडी लागावी, प्रेरणादायी वाचनातून िवद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडावे, या सकारात्मक उद्देशाने वाचन उपक्रम राबवला. मुख्याध्यापक उत्तम चाैधरी यांनी कलाम यांच्या जीवनाची माहिती दिली. शैलेश शिरसाठ यांनी पुस्तके दिली.

‘रायसोनी’त स्पर्धा
रायसोनीइन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये कलाम यांचे अग्निपंख, इंडिया- २० २०, कुटुंब आणि राष्ट्र, छुआ आसमान, प्रेरित विचार, टार्गेट थ्री बिलियन, टर्निंग पाॅइंट ही पुस्तके आठवडाभर विद्यार्थ्यांनी वाचली. विद्यार्थ्यांनी कलाम यांचे विचार आणि कार्य याविषयावर पाॅवर पाॅइंट सादरीकरण केले. स्पर्धेत प्रथम अंकुश जैन सोनाली राजपूत, द्वितीय देविका चांदसरकर तृतीय राहुल दायमा यांना बक्षिसे दिली.

आर.आर. शाळा
कलामांच्याजीवनकार्याविषयी, साहित्य विचारांविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रा.सोनाली रेंभोटकर यांनी वाचनाचे महत्त्व, प्रकार, ई-बुक, वेबविश्वातील साहित्य याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अावडीच्या पुस्तकातील उताऱ्यांचेही या वेळी वाचन केले. प्रा. कविता सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी मुख्याध्यापक डी.एस.सरोदे प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.