आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिका प्रशासनाने उकलले गोलाणी मार्केटच्या गटारीचे गूढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गोलाणी मार्केटमधील समस्या सोडवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याकडे ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधले होते. पदाधिकारी आणि अधिकार्‍यांनी लक्ष घालत सोमवारी तळमजल्यावर साचणार्‍या ड्रेनेजच्या पाण्याचे मूळ शोधत ही समस्या मार्गी लावली आहे.
उत्पन्नाचे स्त्रोत समजल्या जाणार्‍या व्यापारी संकुलांमध्ये प्राथमिक सेवा देण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. वारंवार निवेदने देऊनही फायदा होत नसल्याने व्यापारी हतबल झाले होते. तात्पुरती उपाययोजना केल्यावर तळमजल्यावर पुन्हा ड्रेनेजचे पाणी साचून दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव वाढतच होता. व्यापार्‍यांकडून सेवा शुल्क मिळत नसल्याने मार्केटमधील दिवाबत्ती, स्वच्छता याकडे दुर्लक्ष केले होते. खासगी यंत्रणेकडून ड्रेनेज स्वच्छतेची समस्या सुटत नसल्याने व्यापार्‍यांकडून पालिकेकडे पाठपुरावा सुरू होता. ‘दिव्य मराठी’ने या प्रकरणाकडे लक्ष वेधल्यावर ड्रेनेजचे नकाशे सापडत नसल्याची बतावणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत होती. नकाशांचा शोध घेऊन सोमवारी सकाळपासून प्रभाग अधिकारी अ.वा. जाधव, सुनील भोळे, डॉ. विकास पाटील, एस. जे. बोरोले यांच्यासह कर्मचारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत तळ ठोकून होते.
चेंबरची उंची वाढवण्याचे आदेश
स्थायी समिती सभापती नितीन लढ्ढा, उपमहापौर सुनील महाजन, नगरसेवक श्याम सोनवणे यांनी या प्रकरणात लक्ष घातले होते. गोलाणी मार्केटमधील सांडपाणी वाहून नेणारे चेंबर जमीन लेव्हलला असून त्यावर ढापेही नाहीत. यामुळे कचरा साचत जाऊन पुन्हा चेंबर चोक-अप होण्याची शक्यता लक्षात आली. त्यामुळे तातडीने या चेंबरची दुरुस्ती करण्याची सूचना लढ्ढा यांनी पालिकेच्या अभियंत्यांना दिल्या.
दोन ठिकाणी खोदकाम
गोलाणी मार्केटच्या मागील बाजूस रस्त्याखाली 12 ते 15 फूट खोल असलेले चेंबर शोधण्यासाठी जेसीबीने दोन ठिकाणी खोदकाम केले. विटांनी भरलेली सिमेंटची थैली चेंबरमध्ये टाकून ठेवल्याची बाब उघडकीस आली. नैसर्गिकरीत्या एवढीमोठी विटांची थैली वाहून येणे शक्य नसल्याने चेंबर जाम होण्यासाठी हा कट केल्याचा संशय अधिकार्‍यांना आहे.
आजही स्वच्छता
पावसाचे पाणी चेंबरमध्ये जाऊन पुन्हा समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पडून असलेले साहित्य उचलून हा परिसर मंगळवारी स्वच्छ करण्यात येणार आहे.