आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक विषयांना उजाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- व्यसनमुक्ती,स्त्री-भ्रूणहत्या थांबवा, एकत्र कुटुंबाचे महत्त्व काय असते, यासारख्या वेगवेगळ्या विषयांशी निगडित नाटकांमधून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या जळगाव केंद्रातर्फे बुधवारी बालनाट्य स्पर्धेचे आयोजन केले होते. यात विद्यार्थ्यांनी समाजाशी जुळलेल्या अनेक विषयांना उजाळा देत सादरीकरण केले.
स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानी पीयूष रावळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासन दूध विकास संघाचे मॅनेजर अरुण शेलीकर तसेच ज्ञानेश्वर गायकवाड, कामगार कल्याण अधिकारी मनोज पाटील उपस्थित होते. जिल्ह्यातील १० संघांनी यात सहभाग नोंदवला. परीक्षक म्हणून चिंतामण पाटील, रमेश भोळे, योगेश शुक्ल यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांनी आपल्या सरस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांचे बहारदार सादरीकरण या विद्यार्थ्यांतर्फे केले.