आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतवैभवासाठी नाट्यचळवळ तळागाळापर्यंत रुजवावी लागेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहर, जिल्हा तसेच राज्यभरात नाट्य चळवळ थंडावली आहे. नवीन लेखन, युवा वर्ग या क्षेत्राकडे वळताना दिसून येत नाही. परिणामी जुन्या काळात नाटकांना असलेले वैभव आता कमी झाले आहे. हे गतवैभव परत मिळवायचे असल्यास नाट्य चळवळ ग्रासरूटपर्यंत पोहाेचवण्याची जबाबदारी नाट्यकर्मींची आहे, असा सूर ‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित संवादात उमटला.
१४ विद्या अािण ६४ कलांचे आराध्य दैवत गणराया अाहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शनिवारी ‘दिव्य मराठी’ कार्यालयात ज्येष्ठ नाट्यकर्मींच्या मुक्त संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी उपस्थित असलेेले हेमंत कुळकर्णी, चिंतामण पाटील, श्रीपाद जोशी मंजूषा भिडे यांनी सध्याच्या नाट्य चळवळीवर प्रकाश टाकला. सध्या कलावंत, निर्मात्यांचा कल व्यावसायिकतेकडे वळला आहे. युवा वर्गांला अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. याचा परिणाम थेट नाटकांवर होत असल्याचे चित्र उमटले आहे. भविष्यात हे दिवस बदलायचे असल्यास नाट्यकर्मींनी भारावून जात मेहनत घेण्याची गरज आहे, असे मते व्यक्त केले.
गप्पा
एकांकिका स्पर्धा वाढवाव्या

साहित्यिकांचीओढ कविता करण्याकडे जास्त आहे. त्यांनी नाट्य लेखनाकडे वळले पाहिजे. नाटक लिहिण्याच्या नवनवीन कल्पना वाढवण्यासाठी कार्यशाळा होणे गरजेचे आहे. विषयांची समज कमी पडत असल्यामुळे चांगले लेखन होत नाही. बाहेरील लेखक आपले लेखन देण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा वाढल्या पाहिजेत. शैक्षणिक स्पर्धा करण्यापेक्षा चांगले नाटक निर्माण होईल, याकडे लक्ष देण्याची गरज सध्या भासत आहे.

युवकांनीनाट्यलेखन करावे
लेखकांचीसंख्या कमी झाली आहे. युवकांनी नाट्यलेखन केले पाहिजे. सध्या माणसांची जीवनशैली बदलली आहे. त्यांना थिएटरची गरज भासत नाही. त्यामुळे नाटक एका विशिष्ट चौकटीत अडकून बसले आहे. मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कालबाह्य विषयांवर नाटक सुरू आहेत. माणसाला अंतर्मुख करणाऱ्या विषयांवर लेखन झाले पाहिजे. ज्यांना नाटकच माहित नाही, अशा लोकांपर्यंत ते पोहाेचवण्याची जबाबदारी नाट्यकर्मींची आहे. ती त्यांनी पार पाडली पाहिजे.

लेखकस्पर्धेपुरता मर्यादित
लेखकस्पर्धेपुरता मर्यादित होत चालले आहेत. नाटकाची क्रेझ कमी होण्यामागे कलावंतही दोषी आहेत. नाटक ही सांघिक कला असल्यामुळेही तिची गती संथ झाली आहे. पूर्वी लेखक निर्माण करण्यासाठी प्रयत्न झालेत, ते आताही झाले पाहिजे. केवळ स्पर्धेपुरता नाटक लेखन करता आनंदासाठी झाले तरच पूर्वीचे वैभव पुन्हा मिळू शकते. लेखन, प्रयोगात नावीन्यता आली पाहिजे. नाट्यकर्मींनी ठरवले तर लोकांना आवडेल असे नाटक तयार होतील. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे.

नाटकाकडेवळावे
तरुणपिढीनाटक क्षेत्राकडे वळत नाहीत. सिरियल, शॉर्ट फिल्ममध्ये लवकर करिअर करण्याचा पर्याय ते निवडतात. जुन्या कलावंतांनी युवकांसाठी नवीन प्रयोग केले पाहिजे. नवीन पिढीच्या गरजा कमी झाल्या आहेत. त्यांना सर्व माहिती जागेवर मिळते. परिणामी नाटकाकडे त्यांचा कल नसतो. नाटकाला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न व्हावे.