आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘महाप्रयाण’ या नाटकातून जागवल्या महात्मा गांधींच्या स्मृती, गांधीजींच्या स्मृतींना उजाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत-पाक संबंधाविषयीची चर्चा, यासह गोध्रा परिषदेचा प्रसंग हे "महाप्रयाण' या लघुनाटिकेतून दाखवत महात्मा गांधींच्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित "महाप्रयाण' या नाटकाचे.

महात्मा गांधी पुण्यतिथी हुतात्मा दिनानिमित्त शुक्रवारी सायंकाळी बालगंर्धव खुले नाट्यगृहात "महाप्रयाण' या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक बलिदानानंतर देशाला मिळालेले स्वातंत्र, यात महात्मा गांधींचे योगदान याविषयीचे अनेक प्रसंग प्रोजेक्टरवर दाखवण्यात आले. सुतावर धागा विणत बापूंचा अहिंसेविषयीचा संवाद त्याला विविध पात्रांची मिळालेली जोड ही हुबेहुब साकारण्यात आली. या वेळी राजकोट येथील कलानिकेतन संस्थेच्या कलाकारांनी विविध प्रसंग साकारले, यात १५ कलाकारांचा समावेश होता. यात पंतप्रधान पंडित नेहरूंशी भारत-पाक संबंधाविषयीची चर्चा, घरातील विविध संवाद तसेच सत्य अहिंसेचा दिलेला संदेश याविषयीचे वर्णन कलाकारांनी परिपूर्णपणे साकारले.

अहिंसाच देशाला वाचवू शकते
आगामीकाळातअहिंसाच देशाला वाचवू शकते हा गांधींनी दिलेला संदेश "वैष्णव जन हो', "वंदे मातरम्' या गीतांनी रसिकांमधील देशभक्तीला चालना मिळाली. भरत याज्ञिक यांनी महात्मा गांधींची तर अभय वसाहनी यांनी नेहरू तर राजू याज्ञिक यांनी सरदारांची भूमिका केली. प्यारेलाल, मनू बहन उमाशंकर, आभा यांच्या भूमिकाही अतिशय उत्कृष्ठ ठरल्या. महात्मा गांधींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नाटिकेस सुरुवात झाली. या वेळी जैन उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अशोक जैन, संघपती दलीचंद जैन, निर्माता रेणू याज्ञिक आदी उपस्थित होते.
* गांधी रिसर्च फाउंडेशनने राबवलेला उपक्रम
* १५ कलावंतांच्या संचाने सादर केली लघुनाटिका