आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्यगृहाच्या कामास कोटीचा निधी मंजूर ,जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : जिल्हानियोजन समितीमधून शहरातील बंदिस्त नाट्यगृहासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. नाट्यगृहाच्या विद्युतीकरणाचे काम १५ दिवसांत तर संपूर्ण नाट्यगृहाचे काम दोन महिन्यांत पूर्णत्वास येणार आहे.
 
लांडोरखोरीचे कामही पूर्णत्वाकडे आहे. वनदिनाचे औचित्य साधून लांडोरखोरीचा शुभारंभ करण्याबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी गुरुवारी दिली. 
 
जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक २९ डिसेंबर रोजी झाली. त्या वेळी अपूर्ण कामांबाबत चर्चा होऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दरम्यान, आचारसंहितेमुळेही जानेवारी रोजी मेहरूण तलाव येथे आयोजित कॅशलेसबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित पतंग महोत्सव रद्द करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांनी बाेलतांना सांगितले. 
 
लघुसिंचन विभागाचा निधी अखर्चित 
जलयुक्तशिवार अभियानांतर्गत १०० टक्के कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत. लघुसिंचन विभागाला २५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आतापर्यंत लघुसिंचन विभागाने कोटी रुपयांपर्यंत निधी खर्च केला आहे. उर्वरित निधी मार्चपर्यंत खर्च होणे आवश्यक आहे. मात्र, पदवीधरनंतर जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे २० कोटींचाा निधी अखर्चित राहण्याची शक्यता आहे. 
बातम्या आणखी आहेत...