आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: ‘मूजे’त साकारला ‘ड्रिमी आइज’ प्रकल्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दृष्टिहीन विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे उच्च शिक्षणाच्या सुविधा मिळण्यासाठी मूळजी जेठा महाविद्यालयाने ‘ड्रिमी आइज’ (स्वप्न पाहणारे डोळे) प्रकल्प नुकताच सुरू केला आहे. या प्रकल्पामुळे संगणकच अंध विद्यार्थ्यांना पुस्तके वाचून दाखविणार आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातंर्गत हा उपक्रम सुरु करणारे मु.जे. हे पहिलेच महाविद्यालय आहे.

मू.जे.महाविद्यालयात डिसेंबर 2012मध्ये दोन लाख रुपये खर्च करून संगणकावर देवनागरी ‘ओसीआर’ (ऑप्टिकल कॅरेक्टर रिडर) आणि ‘जस्स’ हे सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यात आले. त्याच्या मदतीने अंध विद्यार्थ्यांना पुस्तके वाचून दाखविणारी संगणक प्रणाली सुरू झाली आहे. ‘ओसीआर’ सॉफ्टवेअर संगणकाच्या स्क्रीनवर स्कॅन केलेल्या इमेजमध्ये (प्रतिमा) अक्षरे असल्याचे संकेत देतो. त्यानंतर ‘जस्स’ हे सॉफ्टवेअर अक्षरांचे वाचन करते. पुस्तके स्कॅन करण्यासाठी कॅमेर्‍याने फोटो इमेज तयार करण्यात येते. कोणत्याही शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी सर्व पुस्तके या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या महाविद्यालयात कला शाखेची तृतीय वर्षाची सोनल मिस्त्री ही एकमेव विद्यार्थिनी या प्रणालीचा वापर करत आहे. पुस्तके स्कॅनिंग करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

अंधांसाठी इन्स्टिट्यूट
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळणार्‍या अनुदानाच्या माध्यमातून मू.जे.महाविद्यालयात अंध विद्यार्थ्यांसाठी इन्सिटट्यूट सुरू करण्यात येणार आहे. यात मोबाइल, संगणक तंत्रज्ञानाचा अंध विद्यार्थ्यांसाठी वापर केला जाणार आहे.

व्यापक उपक्रम
खान्देशातील अंध विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने महाविद्यालयात ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. भविष्यात हा उपक्रम अधिक व्यापक केला जाणार आहे.
-नंदकुमार बेंडाळे, अध्यक्ष, केसीई सोसायटी