आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमरेत खोचलेल्या दारूच्या बाटलीने घेतला जीव, रस्त्यावर पडताच काच मांडीत घुसून मृत्‍यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मद्याचे व्यसन कधीही वाईटच. अतिमद्य प्राशनाने मृत्यू झाल्याचे आपण नेहमीच ऐकतो. मात्र, मध्य प्रदेशातील एका तरुण चटई व्यापाऱ्याचा अतिमद्यप्राशनामुळे नव्हे तर कमरेला खोचलेल्या दारूच्या बाटलीनेच जीव घेतल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील चटई व्यापारी वकील किसन कछाव (वय २२) याने बुधवारी अतिमद्य प्राशन केल्यामुळे तो रस्त्यावरच पडला. या घटनेत त्याच्या कमरेला खोचलेली बाटली फुटली आणि बाटलीच्या काचा पोटात, आणि मांडीत घुसल्याने मांडीची नस कापली गेली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजता एमआयडीसीतील व्ही सेक्टर येथे घडली.

एमआयडीसीतील चटईच्या कंपन्यांमधून होलसेल भावात चटाई खरेदीसाठी मंगळवारी रात्री ११ वाजता वकील आणि त्याचा मित्र रामलाल मांगीलाल खेची (वय २५, मूळ रा.इमलीखेडा, ता.जि.साजापूर, मध्य प्रदेश) आले होते. रात्री वकीलने अतिमद्य प्राशन केले, तसेच आणखी एक बाटली सोबत घेऊन ती कमरेत डाव्या बाजूला खोचली होती. अतिमद्य सेवनामुळे वकीलचा तोल गेला आणि तो कच्च्या रस्त्यावर पडल्यामुळे कमरेत खोचलेली बाटली फुटून काचा त्याच्या मांडी पोटात घुसल्या. यात मांडीची प्रमुख नस कापली गेल्याने अितरक्तस्त्राव झाला. त्याला जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक आर. टी. धारबळे हे तपास करीत आहेत. बुधवारी त्याच्या कुटंुबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला.