आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेटलेल्या कारमधील चालकास वाचवले, ‘दिव्य मराठी’च्या टीमचे प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: अागीमुळे जळालेले वाहन
पाळधी - महामार्गक्र. 6 वर सोमवारी पहाटे वाजेच्या सुमारास धुळ्याकडे जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतला. कारमध्ये चालक फसल्याने त्याला वाचवण्यासाठी 'दिव्य मराठी'च्या प्रिंटिंग प्रेसवरील कर्मचाऱ्यांंनी शर्थीचे प्रयत्न केले आणि त्याला यशही आले. ही घटना पाळधी (ता.धरणगाव) जवळील महामार्गावरील सबस्टेशनजवळ घडली.

हितेश ठाकरे असे कारचालकाचे नाव आहे. नवी असलेली अल्टो ८०० ही कार विनाक्रमांक होती. आग लागण्यापूर्वी या कारलाकुठल्यातरी वाहनाने धडक दिल्याचे दिसत होते. ही कार धुळ्याकडे जात असताना पाळधीजवळ अचानक आग लागली. यातून चालकाला बाहेर पडता येत नसल्याचे "दिव्य मराठी'च्या प्रिंटिंग प्रेसच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. आग विझवण्यासाठी "दिव्य मराठी'चे गोपाळ पाटील, हरेंदर राणा, एसएमडी, प्रॉडक्शन विभागाचे कर्मचारी, पोलिस हवालदार खुशाल पाटील, महामार्ग पोलिसांनी बादल्या भरून पाणी कारवर ओतले. दरम्यान, आगीच्यावेळी कारचे दरवाजे उघडण्यात अडचणी येत असल्याने कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून दरवाजा उघडून चालकास बाहेर काढले. गाडीतील आगीमुळे चालकाचे दोन्ही पाय भाजले गेले आहेत. पोलिसांनी चालकास तातडीने दुसरे वाहन आणून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.