आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्काचूर टेम्पोतून वाचवले चालकाला, नागपूरला जाणारे लष्करी जवान नागरिक मदतीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चक्काचूर झालेल्या टेम्पोमधून चालकाला बाहेर काढताना लष्करी जवान आणि नागरिक - Divya Marathi
चक्काचूर झालेल्या टेम्पोमधून चालकाला बाहेर काढताना लष्करी जवान आणि नागरिक
जळगाव - महामार्गावरील तरसाेद फाट्याजवळ रविवारी दुपारी १२.३० वाजता भुसावळकडे जाणाऱ्या टेम्पाेने अाेव्हरटेक करताना समाेरून येणाऱ्या ट्रकला जाेरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात टेम्पाेचा चुराडा झाल्याने चालक केबीनमध्ये अडकला हाेता. हे पाहून रस्त्याने जाणाऱ्या लष्करातील जवानांनी सतर्कता दाखवून नागरिकांच्या मदतीने चालकाला अवघ्या एक तासात केबिनबाहेर काढले. तसेच त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. दरम्यान, या अपघातामुळे तीन तास वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्याच्या दाेन्ही बाजूला सुमारे चार किलाेमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या.

नागपूर येथून ट्रान्सपाेर्ट कंपनीचा माल घेऊन ट्रक (एमएच-४०-५४८१) जळगावकडे येत हाेता, तर सिमेंटच्या गोण्या घेऊन टेम्पो (एमएच-०४-बीवाय-६१४८) भुसावळकडे जात हाेता. तरसाेद फाट्याजवळ रविवारी दुपारी १२.३० वाजता ट्रकला अाेव्हरटेक करीत असताना टेम्पाेचालकाचा ताबा सुटल्याने टेम्पाे जाेरात ट्रकवर अादळला. यात टेम्पाेने दाेन पलट्या खाल्ल्या, तर ट्रकच्या समोरील दाेन्ही चाके निखळली. या भीषण अपघातात टेम्पाेच्या केबिनचा पूर्णपणे चुराडा हाेऊन चालक गणेश काेळी (वय ३०, रा.मुक्ताईनगर) हा केबिनमध्येच अडकला. गणेश जीवाच्या अकांताने विव्हळत असल्याचे पाहून नागपूरला जाणाऱ्या लष्करातील जवानांनी घटनास्थळी एका शेतात त्यांचे वाहन थांबवले. त्यांनी वाहतूक पाेलिस, परिसरातील नागरिकांची मदत घेऊन टेम्पाेचालकाला केबीन ताेडून बाहेर काढले. त्यानंतर एमआयडीसीच्या १०८ क्रमांकाच्या या रुग्णवाहिकेतून जखमी गणेशला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात अाले. लष्करातील जवान नागरिक वेळीच मदतीला धावून अाले अन् तत्काळ उपचार मिळाल्याने गणेशचे प्राण वाचले. नशिराबाद पाेलिसांनी गणेश कोळीचा जबाब घेतल्यानंतर ट्रकचालक रशिद शेख उस्मान (वय ५२ रा.हसनबाग नंदनवन, नागपूर) याला ताब्यात घेतले. त्याचाही जबाब पाेलिसांनी घेतला. त्यात रशिद शेख याने टेम्पाेचालकाचा अाेव्हरटेक करीत असताना ताबा सुटल्याने तो ट्रकवर आदळून अपघात झाल्याचे जबाबात सांगितले. याप्रकरणी नशिराबाद पाेलिसांत अपघाताची नाेंद करण्यात अाली अाहे.

पुढे वाचा... महामार्गावर वाहनाच्या माेठ्या रांगा, असे काढले चालकाला, रेल्वेला लोंबकळलेल्या प्रवाशाला धाडसी महिलेने दिले जीवदान ​