आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय ड्रॉप रोबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघ सज्ज, कर्णधारपदी अक्षय सोनवणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाराष्ट्र राज्य ड्रॉप रोबॉल संघटना सांगली जिल्हा ड्रॉप रोबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बांबवडेत, ता. पलूस, जि. सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड करण्यात आली आहे. यासाठी नुकतीच निवड चाचणी घेण्यात आली. निवड झालेल्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

या संघात कर्णधार अक्षय सोनवणे, नीलेश खडके, रोहित सोनवणे, अरबाज खान, आकीब शेख, नदीम बेग, मुजम्मील शेख, प्रितेष पाटील, मोहंमद्द दानिश, सईद शहा, फरहान शेख, हुसेन शाह, इरफान शेख, मोईन शेख यांचा समावेश आहे. निवड झालेल्या खेळाडूंचा असोसिएशनतर्फे गौरव करण्यात आला. या वेळी जि.प. विद्यानिकेतनचे उपशिक्षक बाळकृष्ण सोमवंशी, अलफैज उर्दू शाळेचे मुख्याध्यापक पठाण आसिफ खान, मंगला सपकाळे, खुबचंद सागरमल शाळेचे क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील, खान जुबेर अहमद यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. निवड चाचणीच्या यशस्वितेसाठी मयूर देशमुख, राहुल पाटील, नवाब शेख, पी.पी. अत्तरदे यांनी सहकार्य केले.

फोटो - ड्रॉप रोबॉल संघात निवड झालेल्या खेळाडूंसमवेत बाळकृष्ण सोमवंशी, प्रवीण पाटील, असिफखान पठाण, जुबेर अहमद, मयूर पाटील, मंगला सपकाळे आदी.