आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीबाणी : पालिकेच्या बंधा-याने गाठला तळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील पाणीसमस्या गुरुवारी अत्यंत बिकट झाली. पालिकेच्या बंधा-याने अक्षरश: तळ गाठला असून जॅकवेलजवळील पातळी एक मीटरपर्यंत घसरली आहे. हतनूरमधून आवर्तन सोडल्याने शुक्रवारी पालिकेच्या बंधा-यात केवळ चार इंचापर्यंत पाणीपातळी स्थिर राहण्याची शक्यता आहे.

हतनूर धरणातून वेळेत आवर्तन न मिळाल्याने शहरावर पाणीटंचाई ओढावली आहे. गुरुवारी तर पालिकेच्या बंधा-याने तळ गाठला. पाणी उचल होणा-या जॅकवेलच्या महत्त्वपूर्ण भागातील जलपातळी एक मीटरने खालावली आहे. यामुळे उच्चशक्तीच्या वीजपंपाद्वारे सुद्धा आवश्यकतेनुसार पाणी उचल होऊ शकली नाही. परिणामी बुधवारी शहरातील जळगाव रोडचा सर्व विस्तारित भाग, मोहितनगर, श्रीनगर, वांजोळा रोडवरील नवीन हुडको परिसरात पाणीपुरवठा करणे अशक्य झाला. या भागात 50 टक्के कपात करून गुरुवारी पाणीपुरवठा करण्यात आला. दरम्यान, गुरुवारी गजानन महाराजनगर, तर विस्तारित भागाला शुक्रवारी पाणी मिळणार आहे.
पाणीपुरवठ्याचे नियोजन बिघडल्याने नाहाटा चौफुली जलकुंभावरून पुरवठा होणा-या भागाला पाण्यापासून वंचित राहावे लागले. हतनूरमधून सोडलेले आवर्तन शुक्रवारपर्यंत बंधा-यात पोहोचल्यास रविवारपासून रोटेशननुसार पाणीपुरवठा होईल. मात्र, 1 हजार क्युसेसमधील किती पाणी पालिकेच्या बंधा-यापर्यंत पोहोचते याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.