आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यधुंद चालकाने बजरंग बोगद्यात अडकवली रिक्षा, दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; मद्यधुंद अवस्थेत एका रिक्षाचालकाने अरुंद अशा बजरंग बोगद्यातून रिक्षा काढण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी रात्री वाजेच्या सुमारास घडली. मात्र रिक्षा बोगद्यात अडकल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.

बजरंग बाेगदा अरुंद असल्यामुळे यातून केवळ दुचाकी जाऊ शकते, एवढीच जागा अाहे. मात्र अफजल फकीर (रा.तांबापुरा) या रिक्षाचालकाने बोगद्यातून पहिल्यांदा रिक्षा कमी वेगात काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे रिक्षा अडकली. नागरिकांच्या मदतीने त्याने रिक्षा बाहेर ओढली. पाच मिनिटांनी त्याने पुन्हा भरधाव वेगात रिक्षा बोगद्यात घुसवली. यामुळे नागरिकांनी त्याला चोप दिला. त्यानंतर तांबापुरा येथील त्याचे काही मित्र घटनास्थळी येऊन त्याला घेऊन गेले. या प्रकारामुळे बंजरंग बोगद्याकडून जाणारी-येणारी वाहतूक सुमारे अर्धा तास खोळंबली होती.