आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशी खजुरांसह ड्रायफ्रूटला ‘डिमांड’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रमजानचा पवित्र महिना सुरू असून 25 दिवस उलटले आहेत. खजूर सेवन करून रोजा सोडण्याची प्रथा मुस्लिम समाजात आहे. त्यामुळे या दिवसात खजुराला मोठय़ा प्रमाणात मागणी असते. त्याचप्रमाणे परदेशी खजुरांना अधिक डिमांड आहे.

शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या खजुराला प्राधान्य नागरिकांकडून मिळत आहे. 25 दिवसांत 200 किलो खजुराची उलाढाल झाल्याचे नूतन ड्रायफ्रुटचे अजय डेडिया यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रोजाच्या दरम्यान इतर खाद्य पदार्थांची चवसुद्धा जळगावकर घेत असून इन्स्टंट पदार्थांनासुद्धा पसंती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात मोठय़ा प्रमाणात खजुराची उलाढाल होते. साध्या खजुरांप्रमाणेच परदेशी बॉक्समधील खजुरांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. याचबरोबर ड्रायफ्रुटलासुद्धा पसंती मिळत आहे.

परदेशी खजूर
इराण, सौदी अरेबिया, मस्कत, अफगाण याठिकाणाहून खजुराची खरेदी केली जाते. यात बॉक्समधील हे प्रकार असतात. तसेच काही सीडलेस खजूरदेखील यात मिळतात. यंदा इराणमध्ये जो दहशतवादी हल्ला सुरू आहे त्याचा परिणाम या पदार्थांवर झाला असून भारतात कमी प्रमाणात माल आला आहे. त्यामुळे गेल्या वर्षापेक्षा यंदाचा भाव जास्त असल्याने मागणीतही याचा प्रभाव दिसून येत आहे.
फालुदा, समोसा पट्टी
यात फक्त खजूरच नाही तर इतर खाद्य पदार्थांनादेखील मोठय़ाप्रमाणात मागणी वाढली आहे. यात समोसा पट्टी व स्प्रिंग रोल शीट हा प्रकार असून हे फ्रोझोन केलेले पदार्थ आहेत. यामध्ये फक्त मसाला भरून तळून ते खायचे असतात. तसेच इन्स्टंट फालुद्यातही 10 प्रकारचे फ्लेवर पहायला मिळतात. यात केशर, पिस्ता, चॉकलेट, व्हॅनिला, रोझ, रासबेरी, सीताफळ यासारख्या फ्लेवरचा समावेश आहे.