आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबार नावे स्वत: वगळल्यास गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
जळगाव- शहरविधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत दुबार नावे असलेल्या १२ हजार मतदारांना तहसीलदार गोविंद शिंदे यांनी केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्यांमार्फत नोटीस बजावली अाहे. यात ३१ जुलैच्या आत मतदारांनी स्वत:हून नावे वगळण्याची सूचना करण्यात आली आहे.
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात एकूण लाख ३९ हजार ४०० मतदार असून राष्ट्रीय मतदार यादी शुद्धिकरण प्रमाणिकरण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्यांमध्ये यापैकी तब्बल १२ हजार मतदारांची नावे दुबार असल्याचे आढळून आले होते. ही दुबार नावे आढळून आलेल्या सर्व १२ हजार मतदारांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे. या मतदारांना क्रमांकाचा फॉर्म भरून दुबार असलेली नावे वगळावी लागणार आहेत.

मतदार यादी
प्रशासनाने पाठवल्या नाेटीस
यादीत दुबार नाव असणे गुन्हा

मतदारयादीत दुबार नाव असणे कायदेशीर गुन्हा आहे. मतदारांना एकाच वेळेस दोन िठकाणी नावे ठेवता येत नाहीत. मतदार यादी शुद्धिकरण प्रमाणिकरण कार्यक्रमांतर्गत मतदारांनी दुबार नावे स्वत:हून वगळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

मृत स्थलांतरितांचाही समावेश
मतदारयादीत मृत जळगाव शहरातून स्थलांतर केलेल्या मतदारांचाही समावेश आहे. अशा मतदारांची आकडेवारी हजार ३५५ आहे. या कार्यक्रमांतर्गत ९५१ मतदारांनी मतदार यादी दुरुस्ती क्रमांक चा फॉर्म भरून त्यांच्या नावात बदल दुरुस्ती केली आहे. तर ६३८ नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे.

मतदार यादीत दुबार नावे असलेल्या १२ हजार मतदारांना प्रशासनातर्फे नोटीस देण्यात आली आहे. ३१ जुलैपर्यंत त्यांनी स्वत:हून नावे वगळावीत. मतदार यादीत दुबार नावे ठेवणे कायदेशीर गुन्हा आहे. मतदारांनी स्वत:ची नावे वगळल्यास नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. ज्ञानेश्वरसपकाळे, नायब तहसीलदार
बातम्या आणखी आहेत...