आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फीडर बंद झाल्यामुळे शहरात पाच तास वीजपुरवठा खंडित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दमदार पावसासह वादळी वाऱ्यामुळे शनिवारी शहरातील पाच ठिकाणी वीजतारांवर झाडे पडल्याने फीडर बंद पडले. यामुळे अर्ध्या शहरात रात्री १० वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झालेला होता. या वेळीही तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरण अपयशी ठरले.
पोळा सणाचा उत्साह वाढत असताना सायंकाळी वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरातील नवीपेठ, डीवाएसपी चौक, अजिंठा रोडसह मेहरूण, गिरणा टाकी परिसरात तारांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे जिल्हापेठ, काव्यरत्नावली चौक, महाबळ, रामानंद, नवीपेठमधील फीडर ट्रीप झाल्याने या भागातीलही वीजपुरवठा खंडित झाला होता.
रात्री ८.३० वाजेपर्यंत दोन फीडर सुरू करण्यात आले होते. मात्र, शिव कॉलनी, गणेश कॉलनीसह नवीपेठ आदी भागातील फीडर रात्री १० वाजेपर्यंतही सुरू झाले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. दोन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले होते. खंडित वीजपुरवठ्याविषयी संपर्क साधत असताना महावितरणच्या कॉलसेंटरचा फोन लागत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.

दुरूस्ती पथके तत्काळ पाठवली
शहरातविविध ठिकाणी वादळीवाऱ्यामुळे तारा तुटण्यासह फीडर ट्रिप झाले आहेत. घटनेनंतर तत्काळ दुरुस्ती पथके रवाना करण्यात आली. यातील दोन फीडरवर तत्काळ दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत केला. एस.एम.सदामते, कार्यकारीअभियंता, महावितरण