आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्यांमुळे रिक्षा उलटली; अपघातात विद्यार्थिनी जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी विद्यार्थीनीवर जिल्हा रूग्णालयात सुरू असलेले उपचार.
धुळे - कुत्र्यांच्या झुंडीमुळे विद्यार्थिनींची वाहतूक करणारी रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षाचालकासह विद्यार्थिनी जखमी झाल्या. जखमी झालेल्यांमध्ये रिक्षाचालक विनोद साहेबराव पाटील (२६, रा. साईदर्शन कॉलनी), लावण्या रमेश कंड्रे (६, रा. नारायण मास्तर चाळ), जान्हवी किशोरसिंग राजपूत (६) पलक गणेशसिंग राजपूत (६, रा. चितोड रोड) हे जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात फाशीपूल ते शिवतीर्थ रस्त्यावर मा. ध. पालेशा महाविद्यालयाजवळ झाला.

दरम्यान, शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक रस्त्यांवर कुत्र्यांचे टोळके बसलेले दिसते. शहरातील संतोषी माता मंदिर ते लेनिन चौकाकडे जाणाऱ्या ररस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर कुत्रे असतात. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा महापालिकेने बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, यापूर्वी महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न केले होते.
बातम्या आणखी आहेत...