आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जोरदार पावसामुळेे रस्त्यांना नदीचे स्वरूप, दाेन दिवस राहणार पावसाचा जाेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीपेठ परिसरात पाणी साचल्यामुळे रस्त्यावर तयार झालेले तळे अन् त्यातून मार्गस्थ होताना वाहनधारक. - Divya Marathi
नवीपेठ परिसरात पाणी साचल्यामुळे रस्त्यावर तयार झालेले तळे अन् त्यातून मार्गस्थ होताना वाहनधारक.
जळगाव - शनिवारी रात्री मुक्कामी अालेल्या पावसाने रविवारी दिवसभर शहरासह जिल्ह्यात अापल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. दिवसभर थांबून-थांबून जाेरदार बरसलेल्या पावसाने शहरातील अनेक भागातील रस्त्यांना नदीचे रूप प्राप्त झाले हाेते. एसएमअायटी काॅलनी परिसरात सुमारे ५० घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले, हीच स्थिती शहरातील इतर भागांमध्ये देखील पाहाण्यास मिळाली. तसेच शहरातील बहुतांश नाल्यांना पूर अाल्याने काही तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांचे हाल झाले. दरम्यान, रविवार सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी नागरिकांनी घरात राहणेच पसंत केले.

शहरात सकाळपासून सुरू असलेल्या संततधार जाेरदार पावसाने सखल भागात माेठ्या प्रमाणावर पाणी साचले हाेते. क्रीडा संकुलातून स्टेट बँकेजवळून येणारा रस्ता, बसस्थानक सिव्हिल हाॅस्पिटल मागील रस्त्याच्या उतारामुळे माेठ्या प्रमाणावर पाणी बालगंधर्व खुले नाट्यगृह परिसरात अाले. त्याची पातळी सातत्याने वाढत जाऊन जुने नवीन बी.जे. मार्केट परिसराला पाण्याचा वेढा पडला हाेता. बालगंर्धव नाट्यगृह, दाेन्ही मार्केटमधील रस्ता अप्पा महाराज समाधीसमाेरून सिव्हिल हाॅस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सुमारे अडीच ते तीन फूट पाणी साचले. हे पाणी अाेसण्याला चार तास लागले. काेर्ट चाैकातून चित्रा चाैकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील इंडाे अमेरिकन हाॅस्पिटल समाेरही दाेन फूट पाणी साचले हाेते. नवीपेठेतील सरस्वती डेअरी जवळील चाैकात खूपच पाणी साचले होते. या ठिकाणी रस्त्यावरील दुभाजक केवळ अर्धा फूट दिसत हाेते. पद्मालय विश्रामगृहाकडून नेहरू चाैकाकडे जाणाऱ्या मार्गावरही पाणी साचल्याने वाहनचालकांना जातांना खूपच अडचणी येत हाेत्या. शनिपेठेतून ममुराबाद गावाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या रिधूर नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत हाेते. हे पाणी पाहण्यासाठी असंख्य नागरिकांनी गर्दी केली हाेती.

सायंकाळपर्यंत ३० मिलिमीटरपर्यंत पावसाची नाेंद
जळगाव शहरासह जिल्हाभरात शनिवार रात्रीपासून संततधार पाऊस सुरू अाहे. रविवारी दुपारी १२ वाजेनंतर शहरात पावसाचा जाेर वाढला हाेता. अाणखी दाेन दिवस पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला अाहे. रविवारी सकाळी वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी मिलिमीटर पाऊस झाला हाेता. तर सायंकाळपर्यंत सरासरी ३० मिलिमीटरपर्यंत पावसाची नाेंद झाली हाेती. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या २१.७ मिलिमीटर पाऊस झाला. जळगाव शहरात सायंकाळी वाजेनंतर पावसाचा जाेर वाढला.

एसएमअायटी काॅलनीतील नागरिकांचे हाल
मू.जे. महाविद्यालयापासून रिंग राेडकडे येणाऱ्या नाल्याचे पाणी बजरंग बाेगद्यातून एसएमअायटी काॅलनीतील संचालक बंगलाे परिसरातील ५०हून अधिक घरांत गेल्याचे अॅड. विजय काबरा यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाला वळवण्याच्या विषयात नवीन अायुक्तांनी लक्ष घालून हजाराें नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगण्यापासून वाचवावे, अशी मागणी काबरा यांनी केली अाहे.

झाड कोसळले
रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हाॅटेल सिल्व्हर पॅलेसजवळ गुलमाेहरचे झाड काेसळल्याने वाहतूक ठप्प झाली हाेती. अापत्कालीन विभागातील कर्मचारी सुनील काेल्हे, मुरलीधर खडके, माेहसीन खान यांनी रस्ता माेकळा केला.

सतर्कतेचे अादेश
महापालिका क्षेत्रात पावसाने रविवारी दिवसभर जाेर धरल्यामुळे अायुक्त जीवन सोनवणे यांनी अापत्कालीन विभागासह अाराेग्य, बांधकाम पाणीपुरवठा विभागाला सतर्कतेचे अादेश दिले आहेत. अापत्कालीन विभागप्रमुख वसंत काेळी यांच्या माध्यमातून सर्व अभियंत्यांना निराेप देण्यात आला आहे.
पुढे पाहा जळवाव जिल्ह्यातील पावसाचे निवडक छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...