आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जामुळे शेतकऱ्याची गळफासाने आत्महत्या, धरणगावातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धरणगाव - शहरातील माेठा माळीवाडा परिसरातील कर्जबाजारी शेतकऱ्याने रविवारी शेताच्या बांधावरील झाडाला गळफास घेऊन अात्महत्या केली. माेठा माळीवाडा परिसरातील रवींद्र प्रल्हाद महाजन (वय ४१) यांनी रविवारी सकाळी ७.३० वाजेपूर्वी स्वत:च्या गट क्रमांक ५१ मधील शेताच्या बांधावरील निंबाच्या झाडाला गळफास घेतला. त्यांचे बंधू रमेश प्रल्हाद महाजन यांच्या माहितीनुसार धरणगाव पाेलिस ठाण्यात नाेंद करण्यात अाली अाहे. त्यांच्या पश्चात दाेन मुले, दाेन मुली पत्नी असा परिवार अाहे. त्यांच्या नावावर पाच बिघे जमीन असून साडेतीन लाख रुपये कर्ज अाहे. गेल्या तीन वर्षांपासून शेतात काहीच पिकत नाही. सतत नापिकी, कर्ज येणाऱ्या हंगामात बी-िबयाणे घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे कंटाळून अात्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...