आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत मेगा ब्लाॅक, १२ रेल्वेगाड्या रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - भायखळा ते मुंबई दरम्यान रेल्वे मार्गावरील जीर्ण पूल नष्ट करण्याचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले अाहे. त्यासाठी शनिवारी रात्री १२ वाजता मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १८ तासांचा मेगा ब्लाॅक घेण्यात अाला अाहे. भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल १२ रेल्वे गाड्या या कारणासाठी रद्द करण्यात अाल्या असून चार गाड्या नाशिक, मनमाडपर्यंत धावणार अाहेत. मुंबईकडे जाणाऱ्या एकूण ४२ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात अाल्या अाहेत.

अप मार्गावरील नागपूर मुंबई (११४०२), अमरावती मुंबई (१२११२), मनमाड मुंबई (२२१०२), मनमाड मुंबई (१२११०), भुसावळ मुंबई पॅसेजर (५१११४) गाेरखपूर मुंबई एक्स्प्रेस (०२५९७) या गाड्या रद्द केल्या अाहे तर डाऊन मार्गावरील मुंबई भुसावळ पॅसेजर (५११५३), मुंबई नागपूर एक्स्प्रेस (११४०१),मुंबई मनमाड (१२१०९), मुंबई मनमाड (२२१०१), मुंबई गाेरखपूर एक्स्प्रेस (०२५९८) या रविवारी धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात अाहेत. तर हावडा मुंबई मेल (व्हाया नागपूर) (१२८१०) हावडा मुंबई (व्हाया अलाहाबाद) (१२३२१) या गाड्या मनमाडपर्यतच धावतील. लखनऊ - मुंबई पुष्पक एक्स्प्रेस (१२५३३) नांदेड मुंबई तपाेवन एक्स्प्रेस या दाेन गाड्या नाशिकराेडपर्यंत धावतील. अमृतसर दादर पठाणकाेट एक्स्प्रेस, गाेरखपूर मुंबई एक्स्प्रेस, फिराेजपूर मुंबई पंजाब मेल या गाड्या ठाण्यापर्यतच जाणार अाहेत. नागपूर मुंबई ही गाडी दादरपर्यत जाईल.

वेळेत बदल
मुंबई हावडा मेल सकाळी ११०५ एेवजी रात्री ७.४० वाजता सुटेल. मुंबई हावडा मेल संध्याकाळी ५.१५ एेवजी रात्री ७.१० वाजता सुटेल, मुंबई गाेरखपूर संध्याकाळी ७.१० एेवजी पहाटे वाजता सुटेल, मुंबई फिराेजपूर मेल संध्याकाळी ७.४० एेवजी पहाटे ४.१५ ला सुटेल तर महानगरी एक्स्प्रेस रात्री १२.१० एेवजी पहाटे ४.४५ वाजता सुटणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...