आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्र पक्षांमुळे रखडल्या महामंडळाच्या नियुक्त्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यात भाजप-शिवसेनेसह महायुतीमधील इतर पक्षांचे एकत्रित सरकार अाहे. त्यामुळे महामंडळावर नियुक्त्या करताना सर्वसमावेशक निर्णयाच्या दृष्टीने सर्व पक्षांचा ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न सुरू अाहे. त्यात अधिकच विलंब झाल्याने महामंडळावरील नियुक्त्या रखडल्या; परंतु येत्या अधिवेशनापूर्वी हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न अाहे. तसेच जिल्हानिहाय जातपडताळणी समितीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकारांशी बाेलताना दिली.

जिल्हाची अाढावा बैठक घेण्यासाठी अालेले राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी अजिंंठा विश्रामगृहावर महसूल, सामाजिक न्याय अाणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची बैठक घेतली. दुष्काळ असल्याने मद्यविक्री घटल्यामुळे शासनाचे महसुली उत्पन्न कमी झाले अाहे. जिल्ह्यात अल्पसंख्याक विभागाच्या वसतिगृहांचे काम सुरू अाहे. त्याची पाहणी करावी, तसेच जिल्ह्यातील सर्व महामंडळांची अाढावा बैठक घेण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना त्यांनी दिल्या. बैठकीनंतर कांबळे यांनी पत्रकाराशी बाेलताना सांगितले की, महसूल विभाग अाणि सामाजिक न्याय विभागातील समकक्ष अधिकाऱ्यांनी काही मुद्दे उपस्थित केल्याने जिल्हास्तरीय जातपडताळणी समितीचा विषय रखडला हाेता. परंतु, यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार अाहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत देण्यात येणारी अनुदाने, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती यासंदर्भात तक्रारी असल्यास नागरिकांनी थेट माझ्याकडे तक्रार करावी; त्यावर कठाेर कारवाई करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...