आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खान्देशात सात जणांचा मृत्यू, धुळ्यात सेल्फीच्या नादात एकाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव व धुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत सात जणांचा मृत्यू रविवारी झाला. पारोळा तालुक्यातील लोणसिम येथे पावसामुळे भिंत कोसळून बालक ठार झाला. चोपडा तालुक्यातील लासूर-हातेड रस्त्यावरील डबक्या नाल्याच्या पुरात मायलेकींचा मृत्यू झाला. गोरगावले रस्त्यावरील खदानीच्या पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला तर धुळ्यात धबधब्याखाली सेल्फीच्या नादात रितेश साेनर या तरुणाचा मृत्यू झाला. तसेच वीज पडून एकाचा मृत्यू झाला.

लोणसिम येथे शेतमजूर बाळू ठाकरे यांच्या घराची पावसामुळे जीर्ण झालेली भिंत काेसळल्यामुळे साहिल ठाकरे (वय ४) दाबला गेला आणि गुदमरून त्याचा मृत्यू झाला. चोपडा तालुक्यातील पावसामुळे लासूर-हातेड रस्त्यावरील डबक्या नाल्याला पूर आला. या वेळी शेतातून घराकडे परतत असताना उषाबाई जगदीश वाघ (वय ४२) आणि त्यांची मुलगी बबली वाहून गेल्या. चोपडा-गोरगावले रस्त्यावर वृक्षारोपणासाठी रोपांचा शोध पाच मित्र घेत होते. त्यांचे बूट-चप्पल चिखलाने माखले. ते धुण्यासाठी ते नजीकच्या खदानीजवळ गेले. त्यात एकाच्या चपला किनाऱ्यावरून पाण्यात पडल्या. ते काढण्यासाठी राहुल चौधरी (१०) पाण्यात उतरला. तो पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गौरव शिरसाठ (१४) हा सुद्धा पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडला.

जळगावात पाऊस
जळगाव जिल्हाभरात रविवारी बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. दुपारी जाेरदार पाऊस झाल्यामुळे नदी, नाल्यांना पाणी अाले. हतनूर धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे सलग तीन दिवसांपासून पाण्याच्या विसर्ग सुरू अाहे. धरणाचे दाेन दरवाजे उघडले अाहे. धरणात २०९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला अाहेे. यंदा धरण शंभर टक्के भरणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...