आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियामुळे हरवलेली आजीबाई पोहोचली घरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सोशल मीडियाबद्दल अनेकदा शंख केला जातो. मात्र, कोणत्याही गोष्टीच्या दोन बाजू असतातच. शुक्रवारच्या ४२ अंश तापमानात ९६ वर्षीय वृद्ध महिला घर विसरल्याने वणवण भटकत होती. जागरूक नागरिकांनी तिची विचारपूस करून तिचा फोटो व्हॉट्स अॅपवर टाकला. त्यानंतर लोहारा (ता.पाचाेरा) येथील फोटोग्राफरच्या मदतीने अवघ्या दीड तासात वृद्ध महिला सुखरूप घरी पोहोचली.

पोलिस मुख्यालयालगत असलेल्या चिमुकले राममंदिराशेजारील पोलिसांच्या क्वॉटर्समध्ये राहणारे केअरटेकर लक्ष्मण फकिरा राजपूत यांची ९६ वर्षीय आई वेणूबाई राजपूत या शुक्रवारी सकाळी घराबाहेर पडल्या, ते हातात नेलकटर घेऊन. अंगणात बोटाची नखे कापत कापत त्या रस्त्यावर आल्या. तेथून सरळ चालत राहिल्या. वाढलेले वय, हरवलेली स्मृती यामुळे घर कोठे आहे, याचे भान त्यांना राहिले नाही. त्यामुळे दुपारी १२.३० वाजता पंचमुखी हनुमान मंदिरामागे असलेल्या रणछोडनगरात रस्त्यावर बसून त्या रडत होत्या. या वेळी समोर राहणाऱ्या इलेट्रॉनिक्स माध्यमाचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांना त्या दिसल्या. अंगात चांगली साडी, इतरही चांगल्या घरातील वाटावी, असा पेहराव. नेवे यांनी विचारपूस केल्यावर वेणूबाई यांनी ‘बाह्मणांच्या मंदिराच्या शेजारी घर असल्याचे सांगितले. स्वत:चे नावही त्यांना सांगता येत नव्हते. तसेच गावाचे नाव विचारले असता लोहारा सांगितले.
पुढील स्लाइडवर वाचा फोटोग्राफरमुळे पटली ओळख...