आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: यावलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याचा नदी पात्रातील डोहात बुडून मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल : श्रीरामनगरातील १५ वर्षी बालकाचा शनिवारी सायंकाळी नदी पात्रातील डोहात बुडून मृत्यू झाला. मयूर मधुकर पारधे असे त्याचे नाव आहे. मयूर पारधे हा नुकताच दहावीत प्रवेशित झाला होता. शनिवारी कुटूंबियांचा उपवास असल्याने त्यांना खाण्यासाठी आपल्या आजोबांच्या शेतात केळी घेण्यासाठी मयूर आपल्या भावासोबत गेला होता. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सु्मारास खडकाई नदी काठावरील शेतातून येताना पाय घसरूला पडल्याने तो पात्रातील खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडाला. त्याच्या भावाने गावात येवून ही माहिती दिली. मात्र, त्याला होडातून बाहेर काढेपर्यंत मयूरचा मृत्यू झाला होता. प्रकाश पारधे यांच्या खबरीवरून यावल पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद झाली. रात्री उशिरा डॉ.फिरोज तडवी यांनी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन केले. रविवारी सकाळी त्याच्यावर अत्यंविधी होणार आहेत.