आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्तात मिळणाऱ्या भाज्यांमुळे महिलांचा वाळवण्यावर भर सुकवलेल्या भाज्या महिला नंतर सोयीनुसार वापरतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : गेल्यादोन आठवड्यापासून बाजारात भाज्यांचे दर खूपच कमी झाले आहेत. त्यामुळे महिलावर्ग सध्या वाल, गवार, वटाणा शेंदड्या या भाज्या अधिक खरेदी करून त्या उन्हात वाळवण्यावर भर देत आहेत. सुकवलेल्या या भाज्या नंतर सोयीनुसार स्वयंपाकात वापरल्या जातात. कोरड्या भाज्यांमुळे रोज कोणत्या भाज्या कराव्यात, यातून महिला वर्गाची कटकट काही अंशी कमी होण्यास मदत होते. 
 
भाज्या स्वस्त झाल्या की माेठ्याप्रमाणात खरेदी करून पुढील काही दिवस वापरण्यावर गृहिणींचा भर असताे. पूर्वीपासून वाळवलेले विविध पदार्थ तयार केले जातात. राेजच्या भाज्यांपेक्षा वाळवून ठेवलेले हे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे अनेक ठिकाणी तयार केले जातात.
 
काेरडे धान्य घेण्यापेक्षा वटाणे, वाल या भाज्या घेऊन त्याच वाळवून ठेवून त्याचा उपयाेग केला जाताे. खास करून उन्हाळ्याच्या सुरुवातीस गृहिणी भाज्यांची वाळवण करतात. 
 
परंतु यंदा नाेटबंदीच्या प्रभावाने भाज्यांचे दर पडल्याने याची सुरुवात अातापासूनच झाली अाहे. पुढील वर्षभर हे भाज्यांचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये चवीसाठी उपयाेग केला जाताे. कारण भाज्या उन्हात काेरड्या केल्यानंतर परत जर पाण्यात टाकल्या तर त्या टवटवीत हाेतात. त्यामुळे काेरड्या करून भरून ठेवण्यावर गृहिणींचा अधिक कल असताे. 
 
जलश्रीतर्फे साेलर ड्रायर मशीन 
मूजेमहाविद्यालयातील जलश्री संस्थेने खास बचत गटातील महिलांना उपयाेगी पडणारे साेलर ड्रायर मशीन तयार केले आहे. उन्हात भाज्या वाळवल्यास अनेकदा त्यातील अॅराेमा, प्राेटिन, चव, रंग हे उडून जातात. पण या ड्रायर मशीनमध्ये भाज्या वाळवल्यास त्यातील फक्त युरिया हा निघून जाताे अाणि अॅराेमा, प्राेटिन रंग तसेच राहते. सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, गवार, मिरची असे सगळे त्यामध्ये वाळवले जाते, अशी माहिती मूजे महाविद्यालयातील ग्रीन हाऊस टेक्नाॅलाॅजी असिस्टंट प्राेफेसर प्रा. भूषण जाेशी यांनी दिली. 

या भाज्यांना वाळवले जाते 
यातवाल, गवार वाळवल्या जातात. वालाच्या दाण्यांची वेगळी भाजी तर गवार नुसती काेरडी भाजीसाठी वाळवली जाते. तर शेंदड्या हे खान्देशात खास करून वाळवल्या जातात. ताकासाेबत खाण्यासाठी शेंदड्यांची भाजी केली जाते. तर मेथी वाळवून तिचा खुडा हा वर्षभर खाल्ला जाताे. काेथिंबीरदेखील माेठ्याप्रमाणात वाळवली जाते. मसाल्यासाेबतच अनेक भाज्यांमध्ये दररोज तिचा वापर केला जाताे. तर हिरवी मिरचीसुद्धा वाळवली जाते. डब्यात भरून ठेवण्यासही भाज्या सोयीच्या असतात. लसूण वाळवून बारीक करून लसूण पुड ही भरून ठेवली जाते.  
 
 
बातम्या आणखी आहेत...