आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात खेडीजवळ भरधाव वाळूच्या डंपरची ट्रकला धडक, दोन गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- भरधाव वाळूच्या डंपरने भुसावळकडून जळगावकडे येत असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. खेडीजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकचालकासह डम्परमधील एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर महामार्गावर सव्वा तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

भुसावळकडून सी.जे.१४ डी. ०५३५ या क्रमांकाचा ट्रक जळगावकडे येत असताना सकाळी ७ वाजेच्या सुमारास भुसावळकडे जात असलेल्या सी.जे.०५ ए.व्ही.५५२३ या क्रमांकाच्या भरधाव डंपरने समोरून धडक दिली. या अपघातात ट्रकच्या समोरील काचा फुटून कॅबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. समोरचे टायरही पंक्चर झाले. अपघातात ट्रकचालक अब्दुल रहीम अन्वर हुसेन (रा.इदोर,जि.झारखंड) व डम्परमधील एम.डी.शाहजान अन्सारी हे गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकची कॅबीनेट वाकल्याने चालक अब्दुल हुसेन यांना मोठ्या कसरतीने नागरिकांनी कॅबीनमधून बाहेर काढले.अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे.

ट्रकचालक अब्दुल हुसेन यांच्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो..
 
बातम्या आणखी आहेत...