आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर घातले डंपर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी असतानाही गुरुवारी जामाेद येथून वाळू भरून अालेल्या डंपर जात हाेता. या वाहनाला वाहतूक पाेलिस कर्मचाऱ्याने थांबण्यासाठी हात दिला. मात्र, डंपरचालकाने अंगावर डंपर घालून पाेलिसाला चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डंपरचालक, मालक एका व्यक्तीने पाेलिसाला मारहाण करून त्याचा गणवेशही फाडला. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी अनिल तायडे शकूर शेख हे गुरुवारी शिवाजीनगर रेल्वेपुलाजवळ पोलिस चौकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत हाेते. सायंकाळी ६.१५ वाजता जामाेद येथून वाळू भरून येणाऱ्या डंपरला (क्र. एमएच-१९-बीएम-९०९०) तायडे यांनी थांबण्यासाठी इशारा केला. मात्र, डंपरचालक शाहरुख रहेमान सिक्कलगर (रा. नशिराबाद) याने डंपरचा वेग वाढवून तायडे शेख यांच्या अंगावर डंपर घातला. प्रसंगावधान राखून तायडे हे बाजूला झाले. त्यानंतर शाहरूखने काही अंतरावर डंपर थांबवला. या वेळी शाहरूखने दाेन्ही पाेलिसांशी वाद घातला. त्यानंतर त्याने डंपर मालक अजय बढे (रा. के. सी. पार्क) याला फाेन करून बाेलावले. त्याने पाेलिसांना घटनास्थळावर येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर त्याचा एक साथीदार दुचाकीवर अाला. त्याने तायडे यांच्याशी हुज्जत घालून त्यांना उचलून फेकून दिले. त्यानंतर दाेन्ही पाेलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तायडे शेख यांनी डंपर पकडून शहर ठाण्यात लावून चालक शाहरूख याला पाेलिसांच्या ताब्यात दिले.

पाेलिसाला मारहाण केलेली नाही
शिवाजीरेल्वेपुलावर पाेलिस कर्मचारी तायडे यांनी डंपर थांबवले. त्यानंतर त्याने पैशांची मागणी केली. डंपर चालक शाहरूख याने ५०० रुपयांची नाेट दिली. त्यानंतर तायडे यांनी केवळ १०० रुपयांची पावती दिली. मात्र, त्यांनी ४०० रुपये परत दिलेच नाहीत. पैसे परत मागितल्यावर वाद सुरू झाला. काेणीही पाेेलिस कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ केली नाही. अजयबढे, डंपर मालक

पाेलिस ठाण्यातही शिवीगाळ
वाहतूकशाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाळूचा डंपर शहर पाेलिस ठाण्यात अाणला. त्यानंतर डंपर मालक अजय बढे हा पोलिस ठाण्यात अाला. त्याने ठाण्याच्या अावारात तायडे यांना शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
छायाचित्र: अनिल तायडे