जळगाव - अजिंठा रस्त्यावरील साईकृपा हाॅटेलसमाेर बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास चिंचाेलीकडून येणाऱ्या मुरूम भरलेल्या डंपरने समाेरून येणाऱ्या कारला धडक दिली. यात बुलडाणा जिल्ह्यातील मामा-भाचे जागीच ठार झाले.
मलकापूर येथील दिनेश साहेबराव गवळी (वय ३५) अाणि त्यांचा भाचा पवन साेहनलाल यादव (वय २२) दाेघे बुधवारी सकाळी मलकापूर येथून टाटा इंडिका कारने (क्र. एमएच-२०-बीवाय-५६९५) निघाले. दुपारी ३.३० वाजता गॅरेजवर गाडीचे काम केले. त्यानंतर ते अाैैरंगाबादला पवनच्या बहिणीला भेटण्यासाठी निघाले. जळगावात अजिंठा रस्त्यावरील साईकृपा हाॅटेलसमाेर सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास त्यांच्या कारला समाेरून येणाऱ्या डंपरने (क्र. एमएच-१९-झेड-४९२३) धडक दिली. यात दिनेश अाणि पवन हे दाेन्ही जागीच ठार झाले. याप्रकरणी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात गणेश गवळी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला. डंपर चालक किशाेर नन्नवरे (रा. साकेगाव) याला अटक केली. पवन याचे वडील साेहनलाल यादव हे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे चाैकीदार अाहेत. पवन अाणि राहुल दाेन्ही भाऊ मलकापूर येथे मामाकडे राहतात. पवनची स्वत:ची कार हाेती. तर राहुल हा शिक्षण घेत अाहे. दिनेश हा मलकापूर येथे जिनिंग प्रेसिंगमध्ये अाॅपरेटर म्हणून कामाला हाेता. त्याला एक वर्षांचा मुलगाही अाहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाइकांचा अाक्राेश
अपघातातठार झालेले दाेन्ही बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील मामा-भाचे हाेत. मृत दिनेशचा मित्र प्रफुल्ल बाबर हा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अाहे. त्याला अपघात झाल्याचे कळाले. पवनची अात्या ताराबाई गवळी या गवळीवाड्यात राहतात. प्रफुल्ल याने ताराबाई यांना माहिती दिली. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली. रात्री वाजेच्या सुमारास मृत दिनेशचा माेठा भाऊ गणेश मलकापूर येथून िसव्हिलमध्ये अाला. या वेळी नातेवाइकांनी प्रचंड अाक्राेश केला.