आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोतया पोलिसांनी सराफाला गंडवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शृंगार ज्वेलर्ससमोर बुधवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास विजय विसपुते या सराफा व्यावसायिकाकडून दोन तोतया पोलिसांनी 76 हजार किमतीचे चांदीचे दागिने दिशाभूल करून लंपास केल्याची घटना घडली.

ईश्वर कॉलनीतील रहिवासी विजय विसपुते हे रतनलाल बाफना ज्वेलर्स या दुकानात चांदीच्या पाटल्यांचे 20 जोड जमा करण्यासाठी जात असताना शंृगार ज्वेलर्ससमोर दोन अज्ञात लोकांनी स्पेशल ड्यूटीचे पोलिस असल्याचे सांगीतले.तसेच पिशवी तपासताना त्याने 20 पैकी सात पाटल्या लंपास करून पिशवी परत केली व दोघे मोटारसायकलीवर फरार झाले. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली आहे.