आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायब तहसीलदारांची बनावट सही करून तीन प्रकरणे केली मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ई सेवा केंद्रामार्फत दिल्या जाणा-या क्रिमीलेअर प्रमाणपत्रावर ऑपरेटरनेच नायब तहसीलदारांची बनावट सही करून प्रकरण मंजूर करण्याचा प्रकार खुद्द नायब तहसीलदार महेंद्र माळी यांनी उघडकीस आणला. शहरातील भास्कर मार्केटमधील ई सेवा केंद्रावर हा प्रकार घडला. तीन क्रिमीलेअर प्रकरणावर या बनावट सह्या दिसून आल्या.

ऑपरेटरची सुट्टी
शहरासह तालुक्यतील 31 ई-सेवा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना लागणा-या क्रिमीलेअर, जातीचे प्रमाणपत्रासह विविध प्रमाणपत्रांचे शासकीय फी घेऊन वितरण केले जाते. अर्जदारांकडून ई सेवा केंद्राकडे आलेले अर्ज नायब तहसीलदार महेंद्र माळी यांच्या सहीनंतर प्रांताधिकारी अभिजित भांडे यांच्याकडे जातात. तेथून पुन्हा ई-सेवा केंद्रात पाठवून ते संबंधित अर्जदारांना वितरित केले जातात. भास्कर मार्केटमधील ई-सेवा केंद्रातील दिनेश जाधव यांच्या केंद्रातील ऑपरेटर जयेश पाटील याने नायब तहसीलदारांच्या नावापुढे सही केली.

अर्जदार चावदस चिंधू तांंबोळे यांचे दोन व डेलीया मुकेश महाजन यांचे एक अशा एकूण तीन क्रिमीलेअर प्रमाणपत्रावर महेंद्र माळी यांना त्यांच्या बनावट सह्या दिसून आल्या. त्यांनी तत्काळ केंद्रचालक, ऑपरेटर व ई सेवा जिल्हा समन्वयक राहुल देवरे यांना कार्यालयात बोलावले. याप्रकरणी दोघांनाही समज देऊन ऑपरेटरला कामावरून काढण्याच्या सूचनाही देण्यात
आल्या आहेत.

- क्रिमीलेअरची काही प्रकरणे प्रांताधिका-यांकडे पाठवण्यासाठी तपासणी करीत असताना तीन प्रकरणांवरील माझी सही बनावट असल्याचे दिसून आले. याप्रकरणी संबंधितांना लेखी सूचना देऊन केंद्रात दरफलक लावून संबंधित ऑपरेटरला कामावरून काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महेंद्र माळी, नायब तहसीलदार.

फोटो - ऑपरेटरने नायब तहसीलदारांची बनावट सही केल्याचे क्रिमीलेअरचे प्रमाणपत्र.