आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारगमन शुल्काच्या बनावट पावत्यांमुळे वाहनधारक गोंधळात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - बनावट कर पावत्यांच्या माध्यमातून महापालिकेला गंडविल्याचे प्रकरण शमत नाही तोच पारगमन शुल्काच्या पावत्याही बनावटरीत्या वितरित करण्यात येत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पारगमन शुल्काचा ठेका देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेला याची झळ पोहोचणार नाही ; परंतु वाहनधारक वेगवेगळया पावत्या पाहून गोंधळात पडत आहेत. त्यामुळे नवीन घोटाळा झाला की काय, असा प्रश्न पुढे येत आहे.
पारगमन शुल्काची वसुली करताना बनावट पावत्या वाहनधारकांना देण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. त्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने कारवाई करावी, असे निवेदन लोकसंग्राम पक्षाने आयुक्त दौलतखान पठाण यांना दिले आहे.

शासनाने धुळे महापालिकेची जकात रद्द करून एलबीटी अमलात आणली ; परंतु पारगमन शुल्क सुरू ठेवले. पारगमन शुल्काचा ठेका देऊन सात ते आठ महिने झाले आहेत. मात्र, पारगमन शुल्काच्या नाक्यावर काही ठिकाणी बनावट पावत्या वाहनचालकांना देण्यात येत आहे. यातून दिवसाला हजारो रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. मात्र, या बनावट पावत्यांचा सूत्रधार कोण, यात कुणी अधिकारी, कर्मचारी गुंंतले आहेत काय तसेच यात कुणा बाहेरच्या टोळीचा हात आहे काय याची चौकशी झाली पाहिजे. ठेका जरी खासगी व्यक्तीला देण्यात आला असला तरी, अशा प्रकारे बनावट पावत्या नेमके कोण देते, याची चौकशी होणे गरजेचे आहे. महापालिकेचे यावर नियंत्रण असल्याने हा गैरप्रकार भविष्यातही त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे दोषींवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे, असे म्हटले आहे. वेगवेगळया प्रकारच्या पावत्या वाहनधारकांना देण्यात येतात. तेही गोंधळात आहेत. पावत्यांचे क्रमांक बºयाचदा पुसट असतात. त्या जीर्णही असतात. तर कधी को-या कागदाचा वापर करून त्या दिल्या जातात.

- पारगमन शुल्क वसुलीचा ठेका देण्यात आला आहे. त्याप्रमाणे शहरातील जकात नाक्यावर पारगमन शुल्काची वसुली करण्यात येत आहे. त्यातील नरडाणा नाक्यावर बनावट पावत्या आढळल्याची तक्रार आल्याने ठेकेदाराकडून माहिती घेण्यात येईल. तसेच त्यांना गुन्हा दाखल करण्यास सांगण्यात येईल. - दौलत पठाण, आयुक्त, महापालिका

फोटो - पारगमन शुल्काच्या लाल, नारंगी, पिवळया अशा विविध रंगाच्या पावत्यांनी धुमाकूळ घातला आहे. कोणत्या पावत्या खºया हेच वाहनचालकांना कळत नाही.