आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्ये चक्क ३० मोटारसायकलींना बाेगस क्रमांक दिल्याचे उघड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एखादे वाहन कुणाच्या मालकीचे आहे, हे त्या वाहनाच्या क्रमांकावरून कळते. त्यामुळे क्रमांकास फार महत्त्व आहे. असे असतानादेखील पगारिया ऑटोमधून विक्री झालेल्या सुमारे ३० दुचाकींना तेथील तत्कालीन कर्मचाऱ्याने चक्क बोगस क्रमांक दिले आहे.
हा प्रकार काही वर्षांपासून सुरू होता पण कुणी तक्रारी करीत नसल्याने तो उघडकीस येत नव्हता. नेरी येथील वाहनधारकाचे फायनान्सचे हप्ते संपल्याने तो १५ दिवसांपूर्वी आरटीओ कार्यालयात आरसी बुक घेण्यासाठी गेला, त्या वेळी बोगस क्रमांकाचे बिंग फुटले.
नेरी (ता.जामनेर) येथील जयकिसन श्यामराव कुमावत यांनी २५ नोव्हेंबर २०११ रोजी जामनेरच्या प्रभा मोटार्स येथून बजाज कंपनीची डिस्कवरी ही दुचाकी बजाज फायनान्सद्वारे हप्त्याने खरेदी केली होती. त्यांच्या गाडीला पगारिया ऑटोचे कर्मचारी जितू पाटील यांनी एमएच- १९, बीएफ ९१७४ हा क्रमांक मिळवून दिला होता. पण हा क्रमांक बोगस असून तो वसंत पाटील यांच्या नावावर आहे हे कळाल्यावर कुमावत यांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी याविषयी प्रभा मोटार्स पगारिया ऑटो येथे तक्रार केली. मात्र, अद्याप तक्रारीचे निवारण झाल्याने त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
अद्याप पोलिसात तक्रार नाही
चेनस्नॅचिंग, जबरी लूट अशा गुन्ह्यांमध्ये चोरटे दुचाकीचा वापर करतात. काही ठिकाणी दुचाकींना क्रमांकच नसतात. तर काही ठिकाणी असले तरी ते बोगस असतात. अशात ऑटो सेंटरकडूनच ग्राहकांना बोगस क्रमांक देण्याचे प्रकार घडत असतील तर हे अत्यंत धोकादायक ठरणार आहे. कुमावत यांच्या वाहनाला बोगस क्रमांक दिल्याचा प्रकार उघडकीस येऊनदेखील पगारिया ऑटोने तत्कालीन कर्मचारी जितू पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही किंवा साधी पोलिसांत देखील तक्रार देण्याची तसदी घेतली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कंपनीने जर त्यांची पोलिसांत तक्रार केली असती तर चौकशी होऊन आणखी काही दुचाकी बोगस क्रमांकाच्या आहेत काय? याची खात्री पोलिसांना करता आली असती.
असा उघडकीस आला प्रकार

जयकिसन कुमावत यांनी दुचाकी खरेदी केल्यानंतर पगारिया ऑटोच्या कर्मचाऱ्याकडून लागलीच क्रमांक देण्यात आला होता. तो त्यांनी गाडीवर टाकला आहे. २०५७ रुपये महिना याप्रमाणे त्यांना कर्जाचा हप्ता भरावा लागत होता. कर्जफेड झाल्यामुळे त्यांना सप्टेंबर २०१४ मध्ये पागारिया ऑटोने आपल्या दुचाकीची एनओसी घेऊन जाण्यासाठी येताना आरसी बुक घेऊन या, असे पत्र पाठवले. पण कुमावत यांना आतापर्यंत आरसी बुकच मिळाले नसल्याने ते गोंधळात पडले. त्यामुळे त्यांनी आरसी बुक विषयी सुरुवातीला आरटीओ कार्यालय नंतर पगारिया ऑटोत चौकशी केली. या चौकशीत त्यांना आपल्या गाडीला मिळालेला क्रमांक बोगस असल्याचे कळाले. त्याच्या दुचाकीला क्रमांक देणारे पगारियाचे कर्मचारी जितू पाटील यांनी दीड वर्षांपूर्वी नोकरी सोडली आहे. त्यामुळे कुमावत यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
यापूर्वीही असे प्रकार घडले होते
^कुमावत मला येऊन भेटून गेले आहेत. त्यांच्यासोबत झालेला प्रकार लक्षात आला आहे. आम्ही त्यांची समस्या सोडवणार आहोत. त्यांना बोगस क्रमांक देणारे जितू पाटील हे सध्या आमच्याकडे नोकरीस नाहीत. त्यांनी यापूर्वीही २५ ते ३० दुचाकी घेणाऱ्यांसोबत असा प्रकार केला होता. लक्षात आल्यानंतर आम्ही ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण केले होते. विवेकजोशी,
व्यवस्थापक, बजाज ऑटो
आरसीबुक पोस्टाने येईल

^दुचाकी घेतल्यापासून आम्ही आरसी बुकसाठी तगादा लावला होता. मात्र, ते पोस्टाने येईल, असे जितू पाटील यांनी सांगितले होते. आता तो क्रमांकही बोगस असल्याची माहिती आरटीओ कार्यालयातून मिळाली. बऱ्याच दिवसांपासून आम्हाला फिरवण्याचे प्रकार सुरू आहेत. जालिंदरकुमावत, जयकिसन कुमावत यांचा पुतण्या
१००पेक्षा जास्त तक्रारी

^आमचे काम फक्त दुचाकी विक्री करण्याचे आहे. त्यापोटी आम्हाला कमिशन मिळते. पासिंगचे काम जळगावातील बजाज ऑटो येथून होते. यापूर्वीही अशा १०० पेक्षा जास्त तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. या प्रकारात आमची चूक नसते. परमेश्वरतेली, प्रभा मोटर्स, जामनेर