आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१० तास चालली विसर्जन मिरवणूक; फुलांची उधळण करून दुर्गेला निरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - गेल्या११ दिवसांपासून मनोभावे उपासना करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनी बुधवारी जंगी मिरवणुकीतून आदिशक्ती दुर्गादेवीला निरोप दिला. तरुणांसोबतच ठिकठिकाणी महिला, तरुणींनी आकर्षक गरबा खेळून मिरवणुकीची रंगत वाढवली. सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवणाऱ्या उत्सवाचा शेवटही गोड व्हावा यासाठी तगडा बंदोबस्त तैनात होता. तब्बल १० तास ही मिरवणूक चालली.
यंदाच्या नवरात्रोत्सवात शहराने अभूतपूर्व उत्साह अनुभवला. आदिशक्तीची स्थापना झाल्यापासून प्रत्येक सार्वजनिक मंडळाने सांस्कृतिक, धार्मिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम देखाव्यांवर भर दिला. या उत्सवाचा शेवटही अतिशय उत्साहात करण्यासाठी मंडळांनी दोन दिवसांपासून नियोजन केले होते. बुधवारी दुपारी १२ वाजेपासून ठिकठिकाणी मिरवणुकीस सुरुवात झाली. मंडळांनी स्वतंत्रपणे वाजत-गाजत तापी नदी गाठून तेथे मूर्तीचे विसर्जन केले. दरम्यान, गुलाल फुलांची उधळण झालेल्या सार्वजनिक मिरवणुकीस दुपारी वाजता नृसिंह मंदिरापासून सुरुवात झाली. त्यात पाेलिसांची परवानगी घेतलेल्या ४० दुर्गोत्सव मंडळांचा सहभाग होता. पहिल्या क्रमांकावर हनुमान मंडळ होते. नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, डीवायएसपी राेहिदास पवार अादींच्या हस्ते पूजा अारती करून मिरवणुकीस सुरुवात झाली. मोठ्या मशिदीजवळ झालेली फुलांची उधळण लक्षवेधी ठरली. ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत तापी नदीवर पोहोचली. काही मंडळांच्या माेठ्या मूर्ती हतनूर आणि वाघूर धरणावर नेण्यात अाल्या.

रस्ता केला मोकळा
शहर वाहतूक शाखेने जुम्मा मशीदकडून शनी मंदिर वॉर्डाकडे जाणारा रस्ता माेकळा केला होता. तसेच नाहाटा काॅलेज, पांडुरंग टाॅकीज, वरणगाव नाका, चांदवानी माेटुमल चाैक, बाजारपेठ पाेलिस स्टेशन, डाॅ.अांबेडकर चाैक येथेही वाहतूक शाखेने मोर्चा सांभाळला.

असा होता फौजफाटा
शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत चार पाेलिस अधिकारी, ५३ पाेलिस कर्मचारी, शहर वाहतूक शाखा, २० पुरुष हाेमगार्ड, पाच महिला हाेमगार्ड आणि बाजारपेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीत सहा अधिकारी, ७८ पाेलिस कर्मचारी, शहर वाहतूक शाखेचा एक अधिकारी, १० कर्मचारी, ४५ हाेमगार्ड, एलसीबीचे सहा कर्मचारी असा फौजफाटा तैनात होता.

सात सेक्टरमध्ये बंदोबस्त
निरीक्षक चंद्रकांत सराेदे वसंत माेरे यांनी सात सेक्टरमध्ये बंदोबस्त विभागला हाेता. नृसिंह मंदिर ते अप्सरा चाैक, अप्सरा चाैक ते जुम्मा मशीद, जुम्मा मशीद ते गांधी चाैकी, गांधी चाैकी ते बाजारपेठ पाेलिस स्टेशन, वरणगाव राेड, डाॅ. अांबेडकर चाैक ते ग्रीन पार्क-खडका राेड, नाहाटा काॅलेज ते माेटूमल चाैक, पंचशीलनगर मशीद, दीनदयालनगर मशीद, जाम माेहल्ला मशीद, अमरदीप चाैक, रजा चाैक, अष्टभुजा चाैक येथे बंदाेबस्त, तर शालिमार हाॅटेलजवळ बॅरिकेड‌्स हाेते.

बातम्या आणखी आहेत...