आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाल उधळणाऱ्यांना हद्दपार करा! अपर पोलिस अधीक्षक नंदकिशोर ठाकूर यांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - गणेशोत्सवाच्याविसर्जन मिरवणुकीत गरजेपेक्षा जास्त गुलाल उधळणाऱ्यांना पोलिसांनी दुर्गोत्सव विसर्जन मिरवणुकीतून हद्दपार करावे, असा इशारा अपर पोलिस अधीक्षक नंदकिशोर ठाकूर यांनी दिला आहे. दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पोलिस ठाण्यात बुधवारी शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

सार्वजनिक उत्सव फक्त पोलिसांठीच नाही तर सर्व शासकीय अधिकाऱ्यांसाठी आहे. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर दिवे लावणे हे पालिकेचे वीज कंपनीचे काम आहे. त्यांनी ते लक्ष घालून करून घेणे आवश्यक आहे. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अख्तर िपंजारी होते. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ज्यांनी गुलाल उधळला, अतिरेक केला त्यांना दुर्गोत्सव विसर्जन मिरवणुकीत येऊ देऊ नये, अशा सूचनाही अपर अधीक्षकांनी या बैठकीत पोलिसांना दिल्‍या.

*राजू खरारे, प्रशांत कचवे, उमाकांत शर्मा, पालिकेचे अभियंता वि‍वेक भामरे, मोठ्याठ्या मशिदीचे माैलाना यांनी िवचार मांडले. पालिका, वीज कंपनीकडून काहीही कृती होत नसल्याची भावना कार्यकर्त्यांनी मांडली. मुन्ना डाेलारे, बाळू पाटील यांनी सहकार्य केले.
*रोिहदास पवार : शहरातीलचार ते पाच गणेशाेत्सव मंडळांनी मोठ्याठ्या प्रमाणावर गुलाल उधळला आहे. त्यांचे रेकाॅर्डिंग पोलिसांकडे असून ते तपासले जाणार आहे. त्यानंतर कारवाई होईल.

*सतीशदेशमुख : वीजकंपनी आणि पालिकेने समन्वय ठेवून विसर्जन मिरवणुकीत प्रकाश कसा राहील याचा िवचार करावा. पालिका वीज कंपनीने एकमेकांवर विषय ढकलणे थांबवावे.

*एस.सी. वानखेडे : वीजकंपनीकडून वरिष्ठांना पत्र पाठवून भारनियमन बंद करण्याचे सांगितले जाईल. प्रत्येक मंडळाने हजार रुपये भरून वीज कनेक्शन घ्यावे. तसे केल्यास वीज कंपनीच्या भरारी पथकाकडून कारवाई होऊ शकते.

*उपनगराध्यक्ष िवजय चाैधरी : पालिकेतर्फेगणेश विसर्जन मिरवणुकीत फाेकस लावण्यात आले होते. मात्र, वीजपुरवठा बंद असल्याने अंधार होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सर्व समस्या दूर केल्या जातील.

*प्रांताधिकारीिवजयकुमार भांगरे : राजकीयप्रचार होईल असे करू नका. कुठल्याही उमेदवाराचा संबंध राहील असे साहित्यही तेथे ठेवू नका, अन्यथा मंडळाचा खर्च संबंधित उमेदवाराच्या नावे टाकला जाईल.

*नगराध्यक्षअख्तर पिंजारी : भुसावळातीलरस्त्याचा प्रश्न आणि लाइटांचा प्रश्न सोडवला जाईल. कार्यकर्त्यांना होणारा त्रास दूर करण्यासाठी पालिकेतर्फे सर्वाेतोपरी प्रयत्न केले जातील. पोलिस, वीज कंपनीचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन समस्या सोडवू.