आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसखेडा पुलाचा भराव खचतोय; मध्य प्रदेशला जोडणारा महत्त्वाचा रेल्वे सेतू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - मध्य रेल्वेचे अतिशय महत्त्वाचे स्थानक म्हणून भुसावळची ब्रिटिश राजवटीपासून ओळख आहे. मध्य प्रदेशातून उत्तर भारत आणि विदर्भाला जोडणारा हा रेल्वेचा विभाग दळणवळणासाठी सोयीचा आहे. कारण भुसावळातून मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिमेकडील गुजरात आणि दक्षिणेकडील कर्नाटकात जाण्यासाठी रेल्वे गाड्या आहेत.
भुसावळातून मध्य प्रदेशाकडे जाताना तापी नदीवर दुसखेडा गावाजवळ आणि भुसावळपासून अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतरावर ब्रिटिशकाळात रेल्वे पुलाची निर्मिती करण्यात आली होती. कालांतराने या पुलाचे आधुनिकीकरण करण्यात आले. पुलाची नियमित देखभाल दुरुस्ती सुद्धा केली जाते. सद्य:स्थितीत भुसावळकडील बाजूने पूल सुरू होतो त्याखालील भरावाचा काही भाग खचला आहे. या भागाची दुरुस्ती झाल्यास पावसाळ्यात तापीला येणार्‍या पुरापासून कोणतीही हानी होणार नाही.
सन 1911 मध्ये निर्मिती
महाराष्ट्रातून उत्तर भारताकडील राज्यांना रेल्वेद्वारे जोडणार्‍या महाकाय पुलाची निर्मिती 1911 मध्ये झाली आहे. या ठिकाणी पूर्वी लहान पूल होता. तो कमकुवत झाल्याने नवीन पुलाची निर्मिती झाली. सध्या या पुलावरून रेल्वेगाड्यांची ये-जा होते. सुमारे अर्धामीटर अंतराच्या पुलास 32 गाळे आहेत.

नवीन स्ट्रक्चर 2001 मध्ये
रेल्वेगाड्यांची संख्या वाढल्याने रेल्वे प्रशासनाने 2001 ते 2008 या कालावधीत पुलाचे नवीन स्ट्रक्चर तयार केले. विशेष म्हणजे महाकाय पुलास कुठेहीं वेल्डिंग नसून रिबिटद्वारे याची पार्ट जोडणी झालेली आहे. येथील लोखंडाला गंज लागू नये, यासाठी नियमित रंगरंगोटी केली जाते.
तातडीने पाहणी करणार
४रेल्वे प्रशासन नेहमीच जागरूकपणे सर्व पुलांची वेळोवेळी पाहणी, देखभाल-दुरुस्ती करते. दुसखेडा गावाजवळील रेल्वे पुलाच्या भरावाची तातडीने पाहणी करू. भरावाचे दगड निखळून पडत असल्यास दुरुस्ती करण्यात येईल. यासंदर्भात अधिकार्‍यांकडून अहवाल मागवू.
दिव्याकांत चंद्राकार, वरिष्ठ अभियंता, समन्वय

- पूल तयार करताना वेल्डिंग, नटबोल्टचा वापर नाहीच
- अर्धा किलोमीटर अंतरात मोठ्या आकाराचे तब्बल 36 गाळे
- 26 एप्रिल 1853 रोजी विभागात धावली पहिली रेल्वेगाडी