आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात मशिनरी पडताळणी न करताच प्रकल्प सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातून निघणार्‍या घन कचर्‍याचे व्यवस्थापन करण्यासाठी पालिकेने आव्हाणे शिवारात जागा उपलब्ध करून दिली होती. हंजीर बायोटेकने आणलेली मशिनरी कोणत्या दर्जाची आहे, त्याची गुणवत्ता व अचुकता पडताळणी करण्यात आलेली नाही. दिलेल्या मुदतीत प्रकल्प सुरू झालेला नसतानाही दंडात्मक कारवाई करण्यात आली नसल्यासंदर्भात लेखापरीक्षणात ताशेरे ओढण्यात आले आहेत.
बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर आव्हाणे शिवारात हंजीर बायोटेक एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांना 30 एप्रिल 2007 रोजी कार्यादेश देण्यात आले होते. कार्यादेश दिल्यापासून 12 महिन्यांत प्रकल्प सुरू होणे गरजेचे होते. मात्र, विहित मुदतीत प्रकल्प सुरू झाला नव्हता. करारनाम्यातील अटी-शर्तींनुसार प्रतिदिन 3 हजार रुपये दंडात्मक कारवाई होणे गरजेचे होते. मात्र, मक्तेदारातर्फे रेल्वेगेटचे काम सुरू असल्याने उशीर झाल्याचे कारण पुढे केले होते.
यासह प्रकल्प सुरू करताना वेळोवेळी कराराचे उल्लंघन झाल्याप्रकरणी लेखापरीक्षण अहवालात ताशेरे ओढण्यात आले आहेत. मक्तेदाराने मशिनरीसंदर्भातील अहवाल करारासोबत जोडलेला नसल्याने मशिनरींची अचुकता पडताळणी करण्यात आली नसल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. प्रकल्प उभारणीसाठी बांधकाम मंजुरीचे आराखडे, नास्ती या आढळून आलेल्या नाहीत.