आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचराकुंड्या पेटवणार्‍यांवर फौजदारी गुन्हे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहराच्या सौंदर्यात भर घालणार्‍या लोखंडी कचराकुंड्यांचा गैरवापर सुरू झाला असून नागरिकांकडून त्यातील कचरा सर्रास जाळून टाकला जात आहे. यामुळे हवेतील प्रदूषण वाढून नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे कचराकुंड्यांना आग लावताना सापडल्यास दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पालिकेच्या आरोग्याधिकार्‍यांनी दिला आहे. अशा वाईटप्रवृत्तींचा शोध घेण्यासाठी आरोग्य निरीक्षकांवर जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. यात सफाई कर्मचारी जबाबदार असल्यास त्यांचे निलंबन करण्यात येणार आहे.

नवीपेठेतील कॉर्पोरेशन बँकेजवळ दिवसा कचरा कुंडीला आग लावण्यात आल्याचे छायाचित्र ‘दिव्य मराठी’ने गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध के ले होते. त्यातून शहरात सुरू असलेल्या गैरप्रकारामुळे अनेकांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचे छायाचित्राच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रय} करण्यात आला. महापालिकेच्या प्रकल्प विभागाने दीड वर्षापूर्वी शहरात 350 लोखंडी क चराकुंड्या खरेदी केल्या होत्या. या शहराच्या वेगवेगळ्या भागात ठेवण्यात आल्या होत्या. आकाराने मोठय़ा असल्याने दोन दिवसाआड त्या रिकाम्या केल्या जातात. परंतु सद्या शहरात कचराकुंड्यातील कचर्‍याला आग लावण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. भररस्त्यावर कचरा जळत असल्यामुळे धूर होवून वायुप्रदूषण होते. त्यातून येणार्‍या जाणार्‍यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. आगीचे लोळ उठलेले अनेकांनी गुरुवारी अनुभवले.

कर्मचार्‍यांवर होणार निलंबनाची कारवाई
शहराच्या साफसफाईसाठी महापालिकेचे 510 कायम कर्मचारी आहेत तर गटारी स्वच्छतेसाठी 350 व झाडू कामासाठी ठेकेदाराकडील सुमारे 350 कर्मचारी आहेत. बरेच स्वच्छता कर्मचारी कचरा जाळून टाकतात. यापुढे अशा कर्मचार्‍यांचे तत्काळ निलंबन करण्यात येईल. यासंदर्भात येत्या दोन दिवसात लेखी आदेश काढण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.