आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • E Book News In Marathi, School Tex Book, Syllabus, Divya Marathi

शालेय पाठय़पुस्तके ई-बुक्स स्वरूपात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शालेय अभ्यासक्रमातील पहिली ते आठवीपर्यंतची सर्व पुस्तके ई-बुक्स स्वरूपात प्रकाशित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याची जबाबदारी बालभारती या पाठय़पुस्तके प्रकाशित करणार्‍या संस्थेकडे सोपवण्यात आली आहे.
पहिली ते आठवीचा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने बदलत आहे. नवीन अभ्यासक्रमाची पाठय़पुस्तके ई-बुक्स स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा मानस शासनाचा आहे. पुनर्रचित प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला. यंदा इयत्ता तिसरी व चौथीचा अभ्यासक्रम बदलत आहे. पुढील वर्षात उर्वरित वर्गांचा अभ्यासक्रम बदलणार आहे. अभ्यासक्रमासोबतच नवीन पाठय़पुस्तके देखील ई-बुक्स स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अलीकडे मुलांकडून मोबाइलची हाताळणी केली जाते आहे. यातच गेल्या वर्षी खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना टॅब्लेट देऊन त्यांना शालेय अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला होता. शालेय शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, शालेय अभ्यासक्रमाविषयी विद्यार्थ्यांमधील गोडी वाढावी, शिक्षण रंजक आणि संवादात्मक व्हावे या दृष्टिकोनातून ‘शिक्षण पंढरी’चा उपक्रम राबवण्यात आला होता. त्यानुसार ई-बुक्स निर्मितीचे काम बालभारतीकडे देण्याचे शासनाने ठरवले आहे. मात्र, ई-बुक्स तयार करण्याच्या दृष्टीने बालभारतीकडे मनुष्यबळ नसल्याने याबाबतचे काम खासगी संस्थेला देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
अँनिमेशनचा करणार वापर
विद्यार्थ्यांना नव्या पाठय़पुस्तकातील पाठ लवकर अवगत करता यावा, यासाठी पाठांना पूरक अशा छोट्या ध्वनीचित्रफितीदेखील तयार करण्यात येणार आहेत. अँनिमेशनच्या स्वरूपातील काही निवडक पाठांचे गोष्टीरूप सादरीकरण केले जाणार आहे.
आदेश नाही
4वयासंदर्भात प्राथमिक शिक्षण मंडळाला अद्याप कुठलेही आदेश नसले तरी ई-बुक्स स्वरू पात पाठय़पुस्तके बालभारतीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देणे शक्य आहे. विद्यार्थ्यांना गरजेनुसार वेबसाइटवर जाऊन संबंधित विषयाची माहिती घेता येईल. विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी