आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळी सुट्यांमध्ये ‘इ-लर्निंग’चा पर्याय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आजच्या ‘फास्ट फॉरवर्ड’ जगात आपल्याला कोणतीच गोष्ट वेळ घेणारी नको असते. वेळ घेणार्‍या शिक्षणपद्धतीसुद्धा आता जुनाट झाल्या असून, शाळेला तसेच महाविद्यालयांना सुटी लागल्यावर इ-लर्निंगचा पर्याय बहुतांश विद्यार्थी स्वीकारत आहेत.
‘इ-लर्निंग’ शिक्षणपद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे, यात चित्रकलेपासून रसायनशास्त्राच्या लहानसहान प्रयोगांपर्यंत सगळ्याच गोष्टी घरबसल्या शिकायला मिळतात. यू-ट्यूबवर एखाद्या विषयाचे नाव टाकल्यास त्या विषयाशी निगडित ‘टुटोरीअल’ आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या व्हिडिओमधून हवा असलेला विषय लगेचच शिकायलाही मिळतो. इ-लर्निंगचा आणखी एक फायदा म्हणजे, तुम्ही प्रामुख्याने कला विषयाच्या महत्त्वाच्या गोष्टी, जसे क्राफ्टिंग, हॅण्डमेड अँक्सेसरीज, फ्रेम, पेन स्टँड यांसारख्या गोष्टी स्वत: सहजपणे बनवायला शिकू शकतात.
‘मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस’ म्हणजेच मॉक नावाचा एक ऑप्शन ‘गुगल’वर सर्च केल्यास त्यामध्ये ऑनलाइन अभ्यासक्रमांची यादीच आपल्यासमोर क्षणार्धात उपलब्ध होते. असे अभ्यासक्रम ज्याचे सर्टिफिकेट कोर्सेसही उपलब्ध आहेत. कॅमेरा हॅण्डलिंग, फोटो एडिटिंग यांसारख्या अभ्यासक्रमांचा लाभ आपण येथे घेऊ शकतो. ‘मॉक’मध्ये तुम्हाला या सगळ्या अभ्यासक्रमांची माहितीही उपलब्ध होते आणि तुम्ही याविषयी प्रात्यक्षिकेही करू शकतात. मॉक कोर्सेस या ऑनलाइन अभ्यासपद्धतीत आवडीनुसार विषय निवडता येतात. यासाठी गुगलवर mooc हा पर्याय सर्च करून अभ्यासक्रमांची यादी मिळवता येते.