आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-सेवा केंद्राचे ‘आपले सरकार’मध्ये रूपांतर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - एकाच छताखाली शासकीय सेवांचा लाभ मिळावा, बेरोजगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने शासनाने महा ई-सेवा केंद्र सुरू केले अाहे. त्यांचे आता आपले सरकार सेवा केंद्र असे नामकरण होणार आहे. त्याचबरोबर या केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार आहे.
विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी यापूर्वी विद्यार्थी, पालकांसह सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र शासनाने कॉमन सर्व्हिसेस सेंटर सुरू केले. या सेंटरच्या धर्तीवर राज्यातील शहरी भागात महा ई-सेवा केंद्र ग्रामीण भागात ग्रामपंचायतीत संग्राम कक्ष सुरू करण्यात आले. त्यानंतर आता शासनाने महा ई-सेवा केंद्रासह संग्राम कक्षाचे आपले सरकार सेवा केंद्र असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्राच्या माध्यमातून नवीन सेवाही दिल्या जाणार आहेत. सद्य:स्थितीत महा ई-सेवा केंद्रातून विविध प्रकारचे शैक्षणिक दाखले, महसुली प्रमाणपत्र वितरित करण्यात येतात. त्यानंतर आता आपले सरकार सेवा केंद्रातून बँकिंग, पीकविमा, कृषी ग्रामविकासाच्या विविध सेवा, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार नोंदणी, मतदान कार्ड आदी सेवा देण्यात येणार आहेत. विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे ऑनलाइन अर्जही भरता येणार आहेत. त्याचबरोबर रेल्वे प्रवासाचे आरक्षणही या ठिकाणाहून करता येईल. लहानमोठे संगणक अभ्यासक्रमही शिकवण्यात येतील. प्रत्येक ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र असेल. या ठिकाणीही बँकिंगसारख्या अनेक सेवा मिळतील. त्यासाठी आधारकार्ड आवश्यक असेल. बँकेतील व्यवहारासाठी पासबुक एेवजी आधार नंबर थंब इंप्रेशन घेतल्यानंतर अशी सेवा मिळू शकणार आहे. अशाच पद्धतीने आपले सरकार सेवा केंद्रात इतर सेवा समाविष्ट राहणार आहेत.

जिल्ह्यात ५०० केंद्र
जिल्ह्यात१५० महा ई-सेवा केंद्र सुरू आहेत. ‘आपले सरकार’ केंद्रासाठी ४०० जणांनी नोंदणी केली आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीत केंद्र सुुरू करण्यात येणार असल्यामुळे जिल्ह्यात जुने नवीन मिळून ५०० पेक्षा अधिक केंद्र सुरू होतील.

डिजिटल साक्षरता
आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत नॅशनल डिजिटल लिट्रसी मिशन कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील एका व्यक्तीला ऑनलाइन सेवा वापरण्यासाठी मार्गदर्शन करून डिजिटल साक्षर करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...