आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुक्यात हरवली रविवारची पहाट...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - धुक्याचा परिणाम रेल्वेसेवेवरदेखील झाला. उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडल्यामुळे या परिसरासह इतर ठिकाणाहून येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रविवारी उशिरा धावत होत्या.
रेल्वे धावल्या उशिरा
अवकाळी पावसानंतर शहरात हुडहुडी वाढली आहे. शनिवारी सायंकाळी मध्यरात्री झालेल्या पावसानंतर तापमानात घट झाली आहे. त्यामुळे रविवारची पहाट धुक्यात हरवली होती. सकाळी ७.३० वाजतादेखील महामार्गावर वाहनांना हेडलाइट लावून मार्गक्रमण करावे लागत होते. ८.४० वाजेपर्यंत ही परिस्थिती होती. त्यामुळे जळगावकरांना सिमला-काश्मीरमध्ये आल्याचा भास होत होता. शिव कॉलनी स्टॉपजवळील राष्ट्रीय महामार्गावर धुक्याचा सामना करत जात असलेल्या दुचाकी, रिक्षाचे सकाळी ७.३५ वाजता टिपलेले हे छायाचित्र. छाया: आबा मकासरे

या गाड्या धावल्या उशिरा
{१२१३८पंजाबमेल (१ तास ४४ मिनिटे)
{११०१६ कुशीनगरएक्स्प्रेस (२ तास ३८ मिनिटे) {१२१३० आझादहिंद एक्स्प्रेस (३३ मिनिटे)