आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टप्प्याटप्प्याने शिकवलेले लवकर येते लक्षात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रा.डॉ. दीपाली पवार - Divya Marathi
प्रा.डॉ. दीपाली पवार
जळगाव- मुलांनानेहमीच तोंडी परिपाठाप्रमाणे शिकवण्यापेक्षा त्यांना चर्चात्मक आणि प्रयोगात्मक पद्धतीने टप्प्याटप्प्याने शिकवल्यास ते विद्यार्थ्यांच्या लवकर लक्षात येते. शिवाय या पद्धतीने त्यांची गुणवत्तादेखील वाढते, असा निष्कर्ष प्रा.डॉ. दीपाली पवार यांनी आपल्या पीएचडीच्या शोधनिबंधात काढला आहे.
केसीई सोसायटीच्या अध्यापक विद्यालयात कार्यरत असलेल्या प्रा.डॉ. दीपाली शिवदाससिंग पवार यांनी नुकतीच माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे यश आणि त्यांच्या शिक्षकपद्धतीचा परस्पर संबंध (अ स्टडी ऑफ लर्निंग स्टाइल्स इन रिलेशन टू अकॅडमिक अचिव्हमेंट ऑफ स्टुडंट्न्स स्टडिंग इन सेकंडरी स्कूल) या विषयात पीएचडी प्राप्त केली. यासाठी त्यांना माजी प्राचार्य डॉ. सुब्रमण्यम राव यांचे मार्गदर्शन मिळाले. पवार यांनी जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ६० शाळांचा सर्व्हे करून ९वी, १०वीच्या मुलांकडून प्रश्नावली भरून घेतली होती.

यामध्ये त्यांनी मुलांच्या शिक्षणपद्धतीसह त्यांना कोणत्या प्रकारच्या गोष्टी आवडतात, त्यांचा कल कशा प्रकारे शिकवण्याकडे असतो, कोणत्या प्रकारचे शिक्षण मुलांच्या लक्षात जास्त राहते, या विषयी प्रश्न विचारले होते.

संशोधन
सहा प्रकारच्या अध्ययन शैलींवर अभ्यास
पवारयांनी सहा प्रकारच्या अध्ययन शैलींवर अभ्यास केला. यामध्ये ओरल, व्हिज्युअल, अॅक्टिव्ह, रिल्फेक्टिव्ह, सिक्वेंशियल आणि ग्लोबल यांचा समावेश होता. यात सिक्वेंशियल म्हणजे टप्प्याटप्प्यात ज्या पद्धतीने मुलांना शिकवले जाते ते मुलांना लवकर लक्षात येते. सरसकट एकाच पद्धतीने वाचून दाखवणे किंवा माहिती सांगण्यापेक्षा मुलांना चर्चात्मक पद्धतीने किंवा गणित असल्यास काही आकृती काढून, प्रयोग करून शिकवले तर जास्त लक्षात राहते,
असे ध्यानात आले आहे.

मुलांशीएखाद्या विषयावर चर्चा करावी
मुलांनाफक्त भाषिक, पाठ्यपुस्तकातील मुद्यांवरच शिकवता शिक्षकांनी त्यांना बोलते करावे. त्याचप्रमाणे वर्गात वेगवेगळ्या प्रकारच्या कृती मुलांकडून करून घ्याव्यात, मुलांशी एखाद्या विषयाची चर्चा करावी, मुलांचीही मते जाणून घ्यावी अशा सूचनाही त्यांनी शोधनिबंधात केल्या.
प्रत्येक मुलाची अध्ययन शैली वेगळी
प्रत्येकमुलाची अध्ययन शैली वेगळी असून प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या पद्धतीने शिकतो असा निष्कर्ष संशोधनातून निघाला. मुलांना अनेक प्रकारे शिकवले जाऊ शकते तसेच त्यांना निरनिराळ्या पद्धतीने विषय समजावल्यास लवकर पटते हे देखील लक्षात आले. प्रा.डॉ.दीपाली पवार