आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाडू मातीच्या मूर्तींसाठी महिला सरसावल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पर्यावरणाचा समतोल राखायचा असल्यास, प्रत्येकास निरोगी आरोग्य हवे असल्यास पर्यावरण पूरक असलेल्या शाडू मातीच्याच गणपतींच्या मूर्तींची स्थापना करायला हवी. ‘दिव्य मराठी’तर्फे शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानास लहान-मोठी गणेश मंडळे, शाळा, महिला मंडळानेही साथ दिली.

माहेश्वरी शाखेतर्फे कार्यशाळा
अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन मुख्य शाखेतर्फे शनिवारी माहेश्वरी बोर्डिग येथे दोन दविसीय शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. त्यांनी शाळेच्या वदि्यार्थ्यांपुरताच हा कार्यक्रम मर्यादित न ठेवता महिलांनाही यात सहभागी करून घेतले आहे. महिला मंडळांसाठी हा उपक्रम असल्याचे अध्यक्षा सुषमा बाहेती यांनी सांगितले.

भगीरथ शाळेत प्रशिक्षण
भगीरथ शाळेचे कलाशिक्षक विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. त्यासाठी ६० किलो माती आणण्यात आली होती. यानिमित्ताने महिलांनाही गणेशोत्सवात सहभागी होता आले. या वेळी शाडू मातीमध्ये शेण आणि शुद्धतेसाठी गो-मूत्र टाकण्यात आले. त्यानंतर अथर्वशीर्ष पठण सुषमा झंवर यांनी केले. गणेशाची मूर्ती बनविताना कशा प्रकारे काळजी घ्यावी, त्याचा बेस कसा असावा नंतर मूर्तीची घडवणूक कशा प्रकारे हाेते. हे फळ्यावर पाटील यांनी समजावून सांगितले. यात मातीचा गोळ्याला गणेशाचा आकार देण्याचा आनंद महिला व मुलांनी घेतला. मुलांनी आपल्या चिमुकल्या हातांनी शिल्प घडविण्याचे काम केले. लहान हाताप्रमाणेच त्यांनी मूर्तीचा आकार बनविला होता. महिलांनीही आपली साडी खराब होण्याची पर्वा न करता नेहमी पूजेसाठी ज्या गणपती बाप्पाला हात लावताे, त्याचीच मनाेभावे पूजा करीत घडविण्याचे काम केले. यात सचिव प्रवीणा मुंदडा, ललिता अग्रवाल, सुशीला लाठी, सुरेखा बिर्ला, संजना बिर्ला यांचे सहकार्य मिळाले.